Budget 2026-27 : रविवारी बजेट; शेअर बाजार सुरू असणार की बंद? जाणून घ्या

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या म्हणजेच रविवार १ फेब्रुवारी रोजी २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करतील. देशाचा अर्थसंकल्प रविवारी जाहीर होत असल्याने उद्या शेअर बाजार सुरू असणार की बंद याबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. मात्र रविवार असूनही बजेट सदरीकरणाच्या दिवशी शेअर मार्केट सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे इतिहासात दुसऱ्यांदाच रविवारच्या दिवशी शेअर मार्केट सुरू असणार आहे.


रविवारी शेअर मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय दोन्ही बाजार समित्यांकडून घेण्यात आला आहे. मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार या दोन्ही समितीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. साधारणतः शनिवार आणि रविवार या दोन दिवशी शेअर मार्केटचे व्यवहार हे बंद असतात. मात्र मागच्या वर्षी १ फेब्रुवारी २०२५ शनिवारी देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होतं. त्यामुळे तेव्हा पहिल्यांदा शनिवार असूनही शेअर बाजारातले व्यवहार सुरू ठेवण्यात आले होते. त्याचप्रमाणे यंदाही रविवार असूनदेखील शेअर मार्केट सुरू राहणार असल्याचे दोन्ही बाजार समित्यांनी जाहीर केले आहे.


यामुळे उद्या बजेटच्या दिवशी रविवार असूनही ट्रेडिंग करता येणार आहे.  नेहमीच्या बाजार वेळेनुसार म्हणजेच ९:१५ ते ३:३० पर्यंत ट्रेडिंग करता येणार आहे.


अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पापूर्वी संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये भारताचा जीडीपी विकास दर ७.० टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सर्वेक्षणानुसार, देशांतर्गत सुधारणा आणि सरकारी गुंतवणुकीमुळे जागतिक आव्हाने असूनही देशाच्या अर्थव्यवस्थेची अंतर्गत ताकद सतत वाढताना दिसत आहे.
Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने