राज्यात नवीन रक्तपेढी सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

रक्तपिशव्यांचे संकलन करण्यासाठी हमीपत्राची गरज


मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यात नवीन रक्तपेढी सुरू करण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून त्यानुसार महानगरांमध्ये रक्तपेढी स्थापन करण्यासाठी संस्थांना स्वयंप्रेरित रक्तदान शिबिरांद्वारे वार्षिक तीन हजारांपेक्षा अधिक रक्तपिशव्या तर शहरी, ग्रामीण व आदिवासी भागांसाठी दोन हजार रक्तपिशव्यांचे संकलन करण्याचे हमीपत्र द्यावे लागणार आहे. दोन वर्षांनंतर राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून कामगिरीचा आढावा घेण्यात येणार आहे.


सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार नवीन रक्तपेढ्यांना मंजुरी देण्यासाठी तयार करण्यात आलेले परिपूर्ण व व्यापक धोरण लागू करण्यात येत आहे. या धोरणानुसार राज्याचे भौगोलिक क्षेत्र हे महानगर, शहरी, ग्रामीण आणि आदिवासी या चार गटांमध्ये विभागले. महानगरात रक्तपेढी सुरू करू इच्छिणाऱ्या संस्थांना स्वयंप्रेरित रक्तदान शिबिरांद्वारे वार्षिक तीन हजारांपेक्षा अधिक रक्तपिशव्यांचे संकलन करण्याचे हमीपत्र द्यावे लागणार आहे. शहरी, ग्रामीण व आदिवासी भागांसाठी हा निकष दोन हजार रक्तपिशव्या इतका आहे. रक्त हा मौल्यवान संसाधन असल्याने त्याचे घटक वेगळे करून कार्यक्षम वापर करण्यावर यात भर दिला आहे. त्यामुळे भौगोलिक क्षेत्र कोणतेही असले तरी, रक्तघटक विभाजनाची सुविधा उपलब्ध असलेल्या नवीन रक्तकेंद्रांनाच परवानगी देण्यात येणार आहे. एकही रक्तपेढी नसलेल्या ग्रामीण भागामध्ये जिल्हास्तरीय निकष पूर्ण झाले नसले तरी त्यांना परवानगी देण्याची तरतूद केली आहे.


कोणत्या संस्था ठरणार पात्र : एनबीटीसीच्या निकषांनुसार अर्जदार संस्था ही स्वयंसेवी किंवा धर्मादाय स्वरूपाची असून, किमान दोन वर्षे जुनी आणि आरोग्यसेवा क्षेत्राशी संबंधित असावी लागेल. वार्षिक रक्तसंकलन, समुपदेशक व सामाजिक कार्यकर्त्यांची नियुक्ती, घटक विभाजन सुविधा उभारणी आणि एसबीटीसी व एनबीटीसीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याबाबत हमीपत्रे आवश्यक असेल. या संस्थांना देण्यात येणारे ना हरकत प्रमामणपत्र हे दोन वर्षांसाठी वैध राहणार आहे.


रुग्णालय आधारित रक्तपेढीसाठी निकष
रुग्णालयाधारित रक्तपेढीसाठी विशिष्ट निकष घातले आहेत. रुग्णालयाने स्वतंत्र रक्तपेढी उभारण्याची गरज सविस्तर स्पष्ट करणे, खाटांची संख्या व विशेष शस्त्रक्रिया, आपत्कालीन सेवा यांचा तपशील देणे बंधनकारक राहणार आहे. अशा रक्तपेढ्यांना परिसरातील ३ ते ४ रुग्णालयांना रक्त व रक्तघटक पुरवण्याचे हमीपत्र द्यावे लागेल. २०० किंवा त्यापेक्षा जास्त खाटांची क्षमता असलेली वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांना अंतर्गत रक्तपेढीसाठी परवानगी दिली जाईल. सरकारी रुग्णालयांना मात्र आरोग्य विभागाच्या गरजेनुसार रक्तपेढी सुरू करता येईल आणि त्यासाठी परिषदेकडून स्वतंत्र परवानगीची आवश्यकता राहणार नाही.

Comments
Add Comment

Mumbai Local Train : रेल्वे प्रवासी कृपया लक्ष द्या, रविवारी कुठे मेगाब्लॉक आहे ते जाणून घ्या

मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे

Prakash Abitkar : 'अवयवदानाबाबत राज्यभर व्यापक प्रबोधन मोहीम राबवा'

मुंबई : महाराष्ट्रात मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंमलात आल्यापासून आणि २०११ व २०१४ मधील सुधारित कायद्यांनुसार

BARTI : एमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण अनुसूचित जातीच्या उमेदवारांना ‘बार्टी’कडून १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित

Goregaon Bus Fire : गोरेगाव मेट्रो स्थानकाखाली खासगी बस जळून खाक; धुराच्या लोटांमुळे प्रवाशांची धावपळ

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील गोरेगाव परिसरात आज एक अत्यंत भीषण अपघाताची घटना घडली. गोरेगाव मेट्रो

Dahi Handi in mumbai local train : धावत्या लोकल ट्रेनमध्येच फोडली दहीहंडी! बदलापूर-ठाणे लोकलमध्ये महिला प्रवाशांचा अनोखा गोपाळकाला; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवासात एका अत्यंत अनोख्या आणि आगळ्यावेगळ्या दहीहंडी उत्सवाची दृश्ये समोर

Pratap Sarnaik : स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नये; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवा, प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या नियमबाह्य रिक्षांवर कडक कारवाई करा

मुंबई : नियमबाह्य पद्धतीने रस्त्यावर धावणाऱ्या स्क्रॅप रिक्षा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका आहेत. अशा