आता लोकल गाड्या दादर, ठाण्यापर्यंतच धावणार; ३ महिने राहणार हे' प्लॅटफॉर्म बंद

मुंबई : मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. दररोज प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना आता एका मोठ्या जम्बो ब्लॉक चा सामना करावा लागणार आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयालामुळे काही लोकल या दादर ते ठाणे या स्थानकांपर्यंतच धावणार आहेत. त्यामुळे प्रवाश्यांची दमछाक होणार आहे



केव्हा असले हा ब्लॉक


१ फेब्रुवारी पासून म्हणेजच आजपासून सीएसएमटी रेल्वे स्थानकावर ८५ दिवसांचा जम्बो वलोक हा सुरु झाला आहे. हा ब्लॉक १ फेब्रुवारीपासून ते २६ एप्रिल पर्यंत असणार आहे.



ब्लॉक मागचं कारण काय ?


मध्य रेल्वे यावरील काही स्थानकांचा पुनर्विकास होणार असल्याने हा ब्लॉक जाहीर करण्यात आलाय. डिसेंबर २०२२ यामध्ये मध्य रेल्वेने सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाला मंजुरी दिली होती. यासाठी एकूण २,४५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळेच पुढील ८५ दिवस म्हणेजच जवळपास ३ महिने या प्रकल्पाअंतर्गत प्लॅटफॉर्म बंद करण्यात आले आहेत.



कोणते प्लॅटफॉर्म राहणार बंद


या ब्लॉकमुळे आजपासून प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ बंद राहणार आहेत. त्यामुले या दोन्ही प्लॅटफॉर्मवर थांबणाऱ्या लांब पल्ल्याच्या ट्रेन आता सूर्य स्थानकावर थांबणार आहेत. यामुळे सामान्य लोकल ट्रेनच्या वेळेपत्रकावर फारसा परिणाम होणार नसला तरी काही लोकल विलंबाने धावतील.



कोणत्या एक्सप्रेसवेवर होणार परिणाम


या ब्लॉकमुळे सीएसएमटी येथे येणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या दादरपर्यंतच थांबण्यात येतील. दादरपर्यंत थांबण्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये अमरावती–सीएसएमटी एक्सप्रेस (१२११२), बल्लारशाह–सीएसएमटी नंदीग्राम एक्सप्रेस (११०००२), हावडा–सीएसएमटी एक्सप्रेस (१२८१०), भुवनेश्वर–सीएसएमटी कोणार्क एक्सप्रेस (११०२०), बिदर–सीएसएमटी एक्सप्रेस (२२१४४) / लातूर–सीएसएमटी एक्सप्रेस (२२१०८) आणि मडगाव–सीएसएमटी तेजस एक्सप्रेस (२२१२०) यांचा समावेश आहे. शिवाय मंगळुरू - सीएसएमटी एक्सप्रेस (१२१३४) ठाण्यापर्यंतच थांबेल. तरी प्रवाशांनी याची दखल घ्यावी असे अवाहान मध्य रेल्वेनं केलं आहे.



पुनर्विकासात कश्याचा समावेश असेल


सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या पुर्नविकास प्रकल्पात एकूण ४६१,२३४ चुरस मीटर जागेच यात समावेश आहे. यामध्ये प्रवाशांना सुविधा देणाऱ्या स्वतंत्र इमारती, पार्सल सेवा , मेल एक्सप्रेस आणि लोकल ट्रेनला जोडणारे डेक, नवे पादचारी पूल, स्कायवॉल्क अशा गोष्टीचा समावेश आहे. हि काम पूर्ण होताच सीएसएमटी रेल्वे स्थानक प्रवासासाठी अधिक सुखकर होणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर