Gold Silver Price Crash : बजेटच्या तोंडावर सराफा बाजारात 'भूकंप'! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरगुंडी

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) आज, १ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाचा ऐतिहासिक नववा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र, अर्थसंकल्पाच्या काही तास आधीच सराफा बाजारातून एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. जागतिक बाजारात अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतीत प्रचंड घसरण झाली असून गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शनिवारी चांदीच्या दरात तब्बल १९ टक्क्यांची विक्रमी घट झाली, ज्यामुळे चांदीचे दर ३ लाख १२ हजार रुपये प्रति किलोवर आले आहेत. सोन्याच्या दरातही सुमारे २ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली असून, १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख ६५ हजार रुपयांपर्यंत खाली आला आहे. जागतिक स्तरावर मौल्यवान धातूंच्या मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे ही स्थिती ओढवली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून सोन्या-चांदीच्या वाढत्या किमतींमुळे हैराण झालेल्या ग्राहकांना या घसरणीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.



दोनच दिवसांत तब्बल ७२ हजार ५०० रुपयांची मोठी घसरण


सराफा बाजारामध्ये चांदीच्या किमतींनी आजवरची सर्वात मोठी घसरण अनुभवली आहे. गेल्या आठवड्यात उच्चांकी पातळीवर असलेल्या चांदीच्या दरात शनिवारी १९ टक्क्यांची मोठी घट झाली. अवघ्या दोन दिवसांत चांदीचे भाव कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले असून, बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. मागील गुरुवारी चांदीचे दर ४ लाख ४० हजार ५०० रुपये प्रति किलो या ऐतिहासिक पातळीवर होते. मात्र, त्यानंतर सलग दोन दिवस दरवाढ रोखली जाऊन किमतीत मोठी घट झाली. एकाच दिवसात चांदी ७२ हजार ५०० रुपयांनी स्वस्त झाल्याने आता प्रति किलोचा दर ३ लाख १२ हजार रुपयांवर येऊन पोहोचला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला झालेली सर्व दरवाढ शेवटच्या दोन दिवसांत पुसली गेल्याने गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.



सोन्याच्या दरात घसरण


चांदीपाठोपाठ आता सोन्याच्या दरातही मोठी घट झाल्याने सराफा बाजारात खळबळ उडाली आहे. शनिवारी सोन्याच्या किमतीत ३,५०० रुपयांची (२.०७ टक्के) घट नोंदवण्यात आली, ज्यामुळे सोन्याचा भाव आता १ लाख ६५ हजार ५०० रुपये प्रति १० ग्रॅम या स्तरावर खाली आला आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी सोन्याने १ लाख ८३ हजार रुपयांचा उच्चांकी टप्पा गाठला होता. मात्र, जागतिक बाजारपेठेतील विक्रीच्या दबावामुळे आठवडाभराची सर्व दरवाढ अवघ्या काही दिवसांत संपुष्टात आली आहे. किमती पुन्हा एखादा जुन्या पातळीवर आल्याने गुंतवणूकदारांमध्येव चिंतेचे वातावरण असून, येत्या काळात सोन्याचे दार आणखी खाली जातील का अशी भीती सर्वत्र व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Milind Soman Fitness : वयाच्या 60 व्या वर्षीही फिटनेस जबरदस्त! मिलिंद सोमण यांचा 15 मिनिटांचा वर्कआउट आणि फिटनेस मंत्र

Milind Soman Fitness Routine : वयाच्या ६० व्या वर्षीही उत्तम फिटनेस आणि उत्साह कायम ठेवणारे अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण

Nashik Crime : नराधमाला फाशीच ! डोंगराळे बालिका अत्याचार व हत्या प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा, जलदगती न्यायालयाचा मोठा निकाल

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षांच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि

Mobile New Rules: Truecaller शिवाय कळणार अनोळखी कॉल कोणाचा! 1 नोव्हेंबरपासून मोबाईलवर दिसणार कॉल करणाऱ्याचं नाव

Mobile New Rules: मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तो नेमका कोणाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण Truecaller सारख्या अ‍ॅपचा

Jio Platforms IPO : रिलायन्सचा मोठा निर्णय; Jio IPO प्राईस बँड जाहीर, भागधारकांना विशेष लाभ!

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे