Union Budget 2026: वस्त्रोद्योगासाठी बजेटमध्ये कोणत्या मोठ्या घोषणा झाल्या?, मेगा टेक्सटाइल पार्कसह...

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज आपला नववा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करण्यात आला. विशेषतः रविवारी अर्थसंकल्प सादर होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. देशाच्या आर्थिक विकासासोबतच विविध क्षेत्रांना चालना देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. विशेष म्हणजे वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी अर्थमंत्र्यांनी मोठा दिलासा देत महत्त्वपूर्ण उपाययोजना जाहीर केल्या.


वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा
अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी वस्त्रोद्योग क्षेत्राच्या आधुनिकीकरणावर आणि जागतिक स्पर्धेत भारताला पुढे नेण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या. यामध्ये मेगा टेक्सटाइल पार्क,राष्ट्रीय फायबर योजना, मानवनिर्मित फाइबर क्षेत्राचा विस्तार, वस्त्रोद्योग विस्तारासाठी विशेष प्रोत्साहन योजना, राष्ट्रीय हातमाग व हस्तकला कार्यक्रम, टेक्स इको इनिशिएटिव्ह, समर्थ 2.0 योजना – वस्त्रोद्योग क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्यासाठी उद्योग आणि शैक्षणिक संस्थांशी सहकार्य करणे. या योजनांच्या माध्यमातून उत्पादन क्षमता वाढवणे, रोजगार निर्मिती करणे आणि निर्यातीला चालना देण्यावर भर देण्यात आला आहे.


खादी, हातमाग आणि हस्तकलांना प्रोत्साहन
यासोबतच महात्मा गांधी ग्राम स्वराज योजनेअंतर्गत खादी, हातमाग आणि हस्तकला क्षेत्राला विशेष प्रोत्साहन देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. या निर्णयामुळे भारतीय पारंपरिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत प्रवेश सुलभ होणार आहे. तसेच ग्रामीण भागातील कारागिरांना मोठा फायदा होणार आहे.


दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात सरकारची तीन महत्त्वाचे कर्तव्य सांगितली आहेत. आर्थिक विकासाचा वेग वाढवणे आणि टिकवणे – उत्पादकता वाढवून जागतिक स्तरावर सुविधा निर्माण करणे. जनतेच्या आकांक्षा पूर्ण करणे – कौशल्य, क्षमता वाढवणे आणि सर्वांना विकास प्रक्रियेत सहभागी करणे. समावेशक विकास – ‘सबका साथ, सबका विकास’ तत्वावर प्रत्येक कुटुंब, समाज व प्रदेशाला साधन, सुविधा आणि संधी समान मिळतील, अशी तीन कर्तव्य त्यांनी सांगितली.


Comments
Add Comment

Dussehra 2026 : यंदा विजयादशमी २० की २१ ऑक्टोबरला ? जाणून घ्या रावण दहनाची योग्य वेळ आणि पूजेचे मुहूर्त!

भारतीय संस्कृतीमध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत पवित्र, आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणजे 'दसरा' किंवा

Dhanush-Mammootty Movie : धनुष आणि ममूटी पहिल्यांदाच एकत्र झळकणार ? ‘OM: Chapter 1’ चित्रपटाची चर्चा, रिलीज डेट आली समोर

Dhanush-Mammootty Movie : दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार एकाच चित्रपटात पाहायला मिळणार असल्याच्या चर्चेने

रशियात शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा धोका आहे का, किती नुकसान झाले?

मॉस्को : रशियाच्या सुदूर पूर्वेकडील कामचटका द्वीपकल्प परिसरात शुक्रवारी भूकंपाचे अत्यंत तीव्र धक्के जाणवले.

Navi Mumbai Airport आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी तयार नाही? एमिरेट्सचा दावा; NMIA कडून खंडन!

मुंबई: भारतातील सर्वात मोठ्या परदेशी विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या एमिरेट्स कंपनीने, खानपान आणि मालवाहू गोदाम

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यापूर्वी टीम इंडियाने हुकमी एक्का काढला, झालं असं की..

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटच्या सामन्यापूर्वी टीम इंडियात एक बदल करण्यात

Lakme Fashion Week : लडाखच्या 'पश्मिना' आणि पारंपरिक हस्तकलेचा नवी दिल्लीत डंका!

नवी दिल्ली : लडाखचे जगप्रसिद्ध 'पश्मिना' (Pashmina), सुंदर शाली आणि तिथल्या हाताच्या अप्रतिम कलाकुसरीची जादू सध्या