अर्थसंकल्पात संरक्षण, पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रावर भर

नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सादर झालेल्या पहिल्या केंद्रीय अर्थसंकल्पात जागतिक भू-राजकीय परिस्थिती व आव्हानांचा उल्लेख करत देशाचा संरक्षण अर्थसंकल्प ६.८१ लाख कोटी रुपयांवरून वाढवून ७.८५ लाख कोटी रुपये करण्यात आला आहे. यामध्ये १५.२ टक्क्यांची वाढ झाली असून, शस्त्रास्त्र खरेदी व सैन्य आधुनिकीकरणासाठीचा भांडवली खर्च १.८० लाख कोटींवरून २.१९ लाख कोटी रुपये करण्यात आला आहे, म्हणजेच २२ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रासाठी वापरल्या जाणाऱ्या विमानांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी लागणाऱ्या सुट्या भागांच्या निर्मितीसाठी आयात केल्या जाणाऱ्या कच्च्या मालावर मूलभूत सीमाशुल्क माफ करण्याचाही प्रस्ताव अर्थसंकल्पात आहे.ऊर्जा क्षेत्रात, लिथियम-आयन बॅटरी व बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टिमसाठी लागणाऱ्या भांडवली वस्तूंवरील सीमाशुल्क सवलत वाढवण्यात आली आहे. सोलर ग्लास निर्मितीसाठी लागणाऱ्या सोडियम अँटिमोनेटच्या आयातीवरही सीमाशुल्कातून सूट देण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये सार्वजनिक भांडवली खर्च १२.२ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे.


भारताला वैद्यकीय पर्यटनाचे केंद्र बनवण्यासाठी देशभरात ५ प्रादेशिक हब उभारण्याची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. एमएसएमई क्षेत्रासाठी १० हजार कोटी रुपयांचा ‘एमएसएमई ग्रोथ फंड’ स्थापन करण्याचा प्रस्ताव असून, रेअर अर्थ खनिजांसाठी ओडिशा, केरळ, आंध्र प्रदेश व तमिळनाडूमध्ये विशेष कॉरिडॉर विकसित करण्यात येणार आहेत.


 पायाभूत सुविधांवर भर देत ५ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या टियर-२ व टियर-३ शहरांमध्ये विकासकामे सुरू ठेवण्याचे जाहीर करण्यात आले. वस्त्रोद्योगासाठी मेगा टेक्सटाइल पार्क, तसेच खादी व हातमाग उद्योगासाठी ‘महात्मा गांधी ग्राम स्वराज’ उपक्रम राबवण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Gold Rate Today : आनंदाची बातमी ! सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचे भावही उतरले

Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात गुरुवार, 15 ऑक्टोबर रोजी मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून

Gold Silver Rate Today : जळगावच्या सुवर्ण बाजारात सोने-चांदी स्वस्त ! सलग तिसऱ्या दिवशी दर घसरले, पाहा आजचे भाव

Gold Silver Rate Today : जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या दरातील घसरण सलग तिसऱ्या दिवशीही कायम राहिली. बुधवारी

Share Market News: इन्वेस्टर्ससाठी आनंदाची बातमी, सेन्सेक्स तब्बल 1109 अंकांनी वधारला; आयटी शेअर्सची तुफान फटकेबाजी

मुंबई: भारतीय शेअर बाजारात मंगळवारी अभूतपूर्व तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1109.10 अंकांनी

Gold Rate Today : जळगावच्या सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात घसरण, ग्राहकांना दिलासा

Gold Rate Today : जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सलग दोन दिवस दरवाढ झाल्यानंतर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी

मृत्युपत्र कसे बनवावे? का आहे महत्त्वाचे आणि त्यासाठी किती खर्च येतो, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

आयुष्याच्या अनपेक्षित वळणावर आपल्या पश्चात कुटुंबात मालमत्तेवरून वाद होऊ नयेत, असे वाटत असेल तर 'मृत्युपत्र' हा

RBI Repo Rate: आरबीआयने रेपो रेट केला जाहीर, नेमकं काय आहे? जाणून घ्या

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जदारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 5 ते 7 ऑक्टोबरदरम्यान झालेल्या पतधोरण