'कणखर नेत्यामागे दडलेला हळवा माणूस अनुभवला', लांडगेनंतर आणखी एक नेता दादांसाठी भावूक

मुंबई: अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. या अपघातानंतर अवघा महाराष्ट्र हादरुन गेला. अजित पवारांच्या जाण्यामुळे फक्त त्यांच्या पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दु:ख झालं नाही तर विरोधकांनाही झालं. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत अजित पवार विरुद्ध महेश लांडगे वाद टोकाला गेला होता. मात्र अजित पवारांच्या मृत्यूनंतर महेश लांडगेंनी भावूक होत दादांची माफी मागितली. आता लांडगे यांच्यानंतर प्रशांत जगताप भावुक झाले आहेत.


प्रशांत जगताप हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जात होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. तेव्हा शेवटच्या क्षणी प्रशांत यांनी अजित पवारांची साथ सोडली. विचारांशी तडजोड करणार नाही. भाजपासोबत जाणार नाही, अशी त्यांची भूमिका होती. त्यामुळे त्यांनी शरद पवारांसोबत राहणे पसंत केले. पण अलीकडेच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत दोन्ही गट एकत्र येत असल्यामुळे प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ते निवडूनही आले.


दरम्यान आता बारामतीत जाऊन प्रशांत जगताप यांनी अजित पवारांवर अत्यंविधी झालेल्या ठिकाणी भेट दिली. यावेळी जगतापांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर भावूक होत अजित दादांच्या आठवणी सांगितल्या. ज्यावेळी प्रशांत जगताप यांना पॅरालाईज झाला होता, त्यावेळी अजित पवारांनी त्यांची मायेने विचारपूस केली होती. तसेच आपल्या डॉक्टरला कॉल करून योग्य ते उपचार करण्याचे आदेश दिले होते, अशी आठवण प्रशांत जगतापांनी सांगितली.


जगतापांनी काय सांगितले?
अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देताना प्रशांत जगताप म्हणाले, "जून 2022 मध्ये माझा चेहरा पॅरालाईज झाला होता. तेव्हा जवळपास 15 दिवस मी ही गोष्ट जगापासून लपवून ठेवली. 15 दिवस मी चेहऱ्याला मास्क आणि गॉगल लावूनच होतो. अखेर मोठ्या धैर्याने मी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून ही बाब जगासमोर मांडली. सायंकाळी 7 वाजता मी हे फेसबूक लाईव्ह केलं आणि रात्री साडेअकरा वाजता मला अजितदादांचा देवगिरी या त्यांच्या शासकीय निवासस्थानावरून कॉल आला. प्रशांत... हे तू चुकीचं केलंस, तू माझ्यापासून हे का लपवलं? असं म्हणून दादांनी मला सुनावलं. त्यांच्या या रागवण्यामागील आपुलकीची आणि आपलेपणाची भावना तेव्हाही माझ्या मनाला स्पर्श करून गेली. काळजी घे आणि उद्याच सकाळी मुंबईला ये असा दादांनी दिलेला आदेश दिला. तो आदेश मी पाळला."


पुढे बोलताना, दुसऱ्या दिवशी सकाळीच मी मुंबईत अजितदादांच्या भेटीसाठी पोहोचलो. तेव्हा आतमध्ये अजितदादा आणि एकनाथ खडसे यांची बैठक चालू होती. त्यामुळे मी बाहेरच बसलो, हे दादांना कळताच दादांनी मला आत बोलावून घेतले. त्यावेळी सुद्धा माझ्या चेहऱ्यावर मास्क होता. प्रशांत मास्क काढ, मला बघू दे चेहरा असं दादांनी म्हणतच मी मास्क काढला. माझा चेहरा पाहताच दादांनी अतिशय काळजीच्या स्वरात मला रागवण्यास सुरुवात केली, तू पक्षाचा शहराध्यक्ष जरी असलास तरी माझा जवळचा माणूस आहेस, स्वतःची तब्येत बरी नसताना तू मला काहीही न सांगता पक्षाचं काम करतोय, बैठका घेतोय हे काही बरोबर नाही असं दादांनी नाराजीच्या स्वरात सांगितलं. पुढच्याच मिनिटाला दादांनी त्यांच्या स्वतःच्या मोबाईलवरून त्यांच्या फॅमिली डॉक्टरला फोन केला, "प्रशांत माझा घरातला माणूस आहे, त्याच्यावर सर्वोत्तम औषधोपचार करा पण काहीही करून त्याला बर करा" असं दादांनी फोनवरुन डॉक्टरांना सांगितलं. यानंतर तातडीने मला डॉक्टरांकडे जायला सांगून स्वतःच्या PA ना माझ्यासोबत पाठवलं. माझ्या कणखर नेत्याच्या आत दडलेला एक हळवा माणूस त्यावेळी मी अनुभवला, अशा शब्दांत प्रशांत जगतापांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Comments
Add Comment

'घटस्फोटानंतर गोष्टी प्रमाणाबाहेर गेल्या...', युजवेंद्र चहलने दारूच्या व्यसनावर धक्कादायक खुलासा!

भारतीय संघाचा फिरकीपटू गेल्या काही वर्षांपासून वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चेत आहे. काही ना काही त्याच्या

राज्यातील सर्व शाळांमध्ये राज्य सरकार राबवणार विशेष स्वच्छता मोहीम, साफसफाई आणि किरकोळ दुरुस्तीवर देण्यात येणार भर

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे. स्वच्छता

परकीय शक्तींच्या मदतीने देशात अराजकता पसरवण्याचे विरोधकांचे मनसुबे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जहरी टीका

मुंबई: “विरोधक सुप्रीम कोर्टावर मोर्चे काढतात, चाल करुन जातात, पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन करतात, दिल्लीत

वैद्यकीय तज्ज्ञांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिले आरोग्याचे धडे, ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमाला तरूण- तरूणींचा उत्सफुर्त प्रतिसाद

मुंबई: बदलती जीवनशैली, मोबाईलचा वाढता वापर, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि मानसिक ताण या वेगवेगळ्या

Jalna Healthcare Project : जालन्यात कर्करोग, हृदयरोगांसह गंभीर आजारांवर उपचार; 3 हेक्टर जागेला मंजुरी

मुंबई : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जालना येथील

Supreme Court Jobs: 10वी- 12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी, सर्वोच्च न्यायालयात बंपर भरती; साठ हजारांहून अधिक असेल पगार

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टामध्ये तरूणांना नोकरी करण्याची संधी आहे. वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी सुप्रीम