भारतीय विद्यार्थ्यांचा परदेशी शिक्षणाकडे कल

स्टडी इन इंडिया मात्र दुर्लक्षित


मुंबई   : केंद्रीय अर्थसंकल्पात परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देण्यात आला आहे. लिबरलाईज्ड रेमिटन्स स्कीम अंतर्गत शिक्षणासाठी परदेशी पाठवण्यात येणाऱ्या रकमेवरील कर (टीसीएस) कमी करून १० लाख रुपयांवर २% कर लागू करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे परदेशी विद्यापीठांमध्ये शुल्क भरण्याचा भार घटेल. तसेच, भारतात परदेशी विद्यापीठांसाठी पाच नव्या शैक्षणिक केंद्रांची घोषणा झाली आहे. गुजरातमधील गिफ्टसिटी आणि नवी मुंबईतील एज्युकेशन सिटीसारखी केंद्रे औद्योगिक क्षेत्राजवळ उभारली जाणार आहेत, ज्यामुळे देशातील विद्यार्थ्यांना परदेशी दर्जाचे शिक्षण घरबसल्या घेण्याची संधी मिळेल.


नीती आयोगाची उद्दिष्टपूर्ती लांबणीवर
1.भारतीय विद्यार्थ्यांचा परदेशी शिक्षण घेण्याकडे असलेला ओघ आणि परदेशातील शिक्षणावर होणारा भारतीयांचा खर्च यावर दोन महिन्यांपूर्वी नीती आयोगाने एक अहवाल सादर केला होता. त्यानुसार २०२४ मध्ये १३ लाख ३६ हजार भारतीय विद्यार्थी परदेशी गेले. विविध खासगी संस्थांच्या अभ्यासानुसार ६ लाख कोटी रुपये भारतातून परदेशी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च झाले.
2. या पार्श्वभूमीवर परदेशी विद्यार्थ्यांनी भारतात शिक्षणासाठी यावे यासाठी स्वतंत्र धोरण आखण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. त्यानुसार २०३५ पर्यंत साडेतीन लाख परदेशी विद्यार्थ्यांनी भारतात शिक्षणासाठी यावे असे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे.
3. मात्र, त्यादृष्टीने काही ठोस तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. आयआयटीची प्रवेश क्षमता साडेसहा हजारांनी वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र जुन्या आयआयटीपेक्षा २०१४ नंतर स्थापन झालेल्या संस्थांसाठी प्रामुख्याने तरतूद करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Gold Rate Today : आनंदाची बातमी ! सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचे भावही उतरले

Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात गुरुवार, 15 ऑक्टोबर रोजी मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून

Gold Silver Rate Today : जळगावच्या सुवर्ण बाजारात सोने-चांदी स्वस्त ! सलग तिसऱ्या दिवशी दर घसरले, पाहा आजचे भाव

Gold Silver Rate Today : जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या दरातील घसरण सलग तिसऱ्या दिवशीही कायम राहिली. बुधवारी

Share Market News: इन्वेस्टर्ससाठी आनंदाची बातमी, सेन्सेक्स तब्बल 1109 अंकांनी वधारला; आयटी शेअर्सची तुफान फटकेबाजी

मुंबई: भारतीय शेअर बाजारात मंगळवारी अभूतपूर्व तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1109.10 अंकांनी

Gold Rate Today : जळगावच्या सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात घसरण, ग्राहकांना दिलासा

Gold Rate Today : जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सलग दोन दिवस दरवाढ झाल्यानंतर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी

मृत्युपत्र कसे बनवावे? का आहे महत्त्वाचे आणि त्यासाठी किती खर्च येतो, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

आयुष्याच्या अनपेक्षित वळणावर आपल्या पश्चात कुटुंबात मालमत्तेवरून वाद होऊ नयेत, असे वाटत असेल तर 'मृत्युपत्र' हा

RBI Repo Rate: आरबीआयने रेपो रेट केला जाहीर, नेमकं काय आहे? जाणून घ्या

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जदारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 5 ते 7 ऑक्टोबरदरम्यान झालेल्या पतधोरण