भारताचे 'डिजिटल' महाशक्ती होण्याकडे पाऊल!

मुंबई : जग तंत्रज्ञानाच्या बाबतीत वेगाने पुढे जात आहे. या वेगावर स्वार होण्यास भारतीयांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक पावले उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प २०२६ मध्ये तंत्रज्ञान क्षेत्रासाठी एक 'गेमचेंजर' घोषणा केली आहे. जागतिक क्लाउड कंपन्यांना भारतात आकर्षित करण्यासाठी सरकारने तब्बल २०४७ पर्यंत कर सवलत (Tax Holiday) जाहीर केली आहे. या निर्णयामुळे भारत आता जगाचे 'डेटा हब' बनण्याच्या दिशेने कूच करत असून, संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी खरेदी दिसून आली.


२०४७ पर्यंत ‘टॅक्स हॉलिडे’ची घोषणा


सरकारकडून परदेशी क्लाउड कंपन्यांना एक विशेष ऑफर


जर जागतिक कंपन्यांनी भारतात डेटा सेंटर उभारले आणि तिथून जगभरात सेवा दिल्या, तर त्यांना २०४७ पर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही.
1 अट : भारतीय ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवा एका 'भारतीय पुनर्विक्रेत्यामार्फत' देणे अनिवार्य असेल. यामुळे जागतिक स्तरावरील 'हायपरस्केलर्स' (जसे की ॲॅमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट) भारतात मोठी गुंतवणूक करण्याची शक्यता         आहे.
2 अनंता राज : दिल्ली एनसीआर भागात डेटा सेंटर पार्क्स उभारणाऱ्या या कंपनीचा शेअर १० टक्केनी वधारला. एमके ग्लोबलने या शेअरसाठी ८०० रुपयांचे मोठे लक्ष्य दिले आहे.
3 ओरिएंट टेक्नॉलॉजीज : आयटी पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या या कंपनीत गुंतवणूकदारांनी मोठी रस दाखवला, ज्यामुळे शेअर ९ टक्केनी वाढला.
4 टेक्नो इलेक्ट्रिक : डेटा सेंटरच्या बांधकामासाठी लागणाऱ्या वीज यंत्रणा पुरवणाऱ्या या कंपनीचा शेअर ८ टक्क्यांनी वधारला.
5 नेटवेब टेक्नॉलॉजीज : सुपरकंप्युटिंग आणि सर्व्हर बनवणाऱ्या या कंपनीला नव्या डेटा सेंटर्सचा मोठा फायदा होणार असल्याने शेअर ६ टक्केनी वाढला.
6 कमिन्स इंडिया : डेटा सेंटर्सना अखंड वीजपुरवठा करण्यासाठी लागणाऱ्या जनरेटर्सची मागणी वाढणार असल्याने या शेअरमध्येही सकारात्मकता दिसून आली.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण