काळाघोडा कला महोत्सव २०२६ मधील 'ती'ची चौकट

“बाई आणि चौकट” हे स्त्री जीवनावर भाष्य करणारं प्रतिकात्मक वाक्य आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतं.
चौकट म्हणजे चार कोनांमधली मर्यादा, चौकट म्हणजे समाजाने ठरवलेली स्त्रीची भूमिका, चौकट म्हणजे स्त्रीच्या वाटणीला आलेली प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सगळीच बंधनं.


बाईच्या भोवती असते नात्यांची चौकट, सामाजिक चौकट, लग्न, संसार, मुलं- बाळांची चौकट, विचार, स्वातंत्र, इच्छा, मर्यादा यांचीही चौकट. इतकंच काय, तर ती रहात असलेलं घर आणि त्यातील कितीतरी गोष्टी चौकटीमधीलच असतात. घराच्या वेगवेगळ्या लांबी आणि रुंदीच्या पण चौकोनी भिंती, दारं- खिडक्यांची चौकट, स्वयंपाक घरातील ओटा, शेगडी, मायक्रोव्हेव, कपाटं, हात पुसायचे रुमाल, भिंतीवरील घडयाळ इतकंच काय तर ज्यात बाईपण मिरवता येते ती साडी आणि अदृश्य रूपात वावरणाऱ्या देवाचा देव्हारा ही चौकट साधूनच तयार केलेला असतो. ती समाजातच काय पण आपलं सर्वस्व म्हणजे घर या संकल्पनेत वावरत असली तरी ती चौकटीतच रहात असते मनाने आणि शरीरानेसुद्धा. जणू “स्त्री म्हणजे एक चौकटच.”


पण मला वाटते या सगळ्या चौकटी मधून ही बाई आपलं आपलं जग जगत असते, आपली आपली एक गोष्ट साकारत असते, आपला सिनेमा लिहीत असते. ती तिच्या चौकटीत राहून चौकटी पलीकडील कार्य करत असते.


हेच सगळं सांगणारं माझं हे इन्स्टॉलेशन काळाघोडा कला महोत्सव २०२६ यात लागलं आहे. यात चार वेगवेगळ्या वयातील आणि वेगवेगळ्या वर्गातील स्त्रिया दाखवल्या आहेत. त्यापैकी एकीच्या हातात कॅमेरा आहे तर एकीच्या हातात रीळ आहे. एकीच्या हातात आपलं यश दाखवणारी ट्रॉफी आहे तर एक आपण लिहिलेली गोष्ट वाचत आहे. एकूण काय, प्रत्येक स्त्री आपली आपली गोष्ट सादर करताना दाखवली आहे.



माझं हे इन्स्टॉलेशन अश्या सगळ्या महिला ॲक्टर्स, डिरेक्टर्स, रायटर्स, एडिटर्स, डीओपीनां समर्पित आहे ज्या आपल्या महाराष्ट्रातल्या फिल्म्समध्ये काम करत आहेत. आपलं महाराष्ट्र हे एकमेव असं राज्य आहे जे मुंबई फिल्मसिटीमध्ये काम करणाऱ्या महिला दिग्दर्शकांना अनुदान देऊन त्यांना प्रोत्साहीत करतात.
हे इन्स्टॉलेशन करण्याचं दुसरं कारण म्हणजे, मी अश्या बऱ्याच महिला ॲक्टर्स, डिरेक्टर्स, रायटर्स, एडिटर्स, डीओपी बरोबर व्यवसायिक अनेक कामं केली आहेत. काही नावं नमूद करायला मला नक्कीच आवडतील. विद्याताई पटवर्धन, स्मिता तळवलकर, सुलेखा तळवलकर, मनवा नाईक, प्रतिमा कुलकर्णी, भाग्यश्री जाधव, सारिका ढेरंगे, अक्षता आचार्य, अर्चना बोराडे, प्राजक्ता सापते, अश्विनी परांजपे, शैली शर्मा, अपूर्वा मोतीवाला, अंकिता तावडे त्याच बरोबर, गेले अनेक वर्ष सुरवातीपासून आतापर्यंत सातत्याने काळाघोडा कला महोत्सवाच्या मुख्य ब्रिंदा मिलर आणि फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक,धडाडीच्या महिला IAS अधिकारी श्रीमती स्वाती म्हसे पाटील या सगळ्यांची ओळख सामान्य माणसांपर्यंत पोहचावी या हेतूने आणि या सगळ्यां बद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी हे इंस्टालेशन केलं आहे.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’