भारतातील प्रमुख नद्या होणार महामार्ग!

२० नव्या जलमार्गांची घोषणा 


नवी दिल्ली : यंदाच्या अर्थसंकल्पात महामार्ग, हायस्पीड रेल्वेसह अनेक मोठ्या पायाभूत सेवासुविधांच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. त्यात २० नव्या जलमार्गांची घोषणा करण्यात आली आहे. या प्रकल्पाअंतर्गत भारतातील नद्या महामार्ग होणार आहेत. दळवळणाचा नवा स्त्रोत निर्माण होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान घोषणा केली की पाच वर्षांत २० नवीन जलमार्ग सुरू केले जातील. वाराणसी आणि पाटणा येथे जहाज दुरुस्ती सुविधा स्थापन केल्या जातील. सीप्लेन व्हीजीएफ योजना सुरू केली जाईल. अंतर्देशीय जलमार्गांना प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसंकल्पात एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. गंगा नदीतून जाणारी जहाजे आणि क्रूझ जहाजांना देखभालीसाठी आता इतर राज्यांवर अवलंबून राहावे लागणार नाही. अर्थमंत्र्यांनी घोषणा केली आहे की वाराणसी आणि पाटणा येथे आधुनिक जहाज दुरुस्ती केंद्रे स्थापन केली जातील. यामुळे केवळ पर्यटन आणि मालवाहतुकीला चालना मिळणार नाही तर स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होतील. या उपक्रमामुळे केवळ जलवाहतुकीला सक्षमता मिळणार नाही तर स्थानिक अर्थव्यवस्था देखील बळकट होईल. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, या प्रकल्पाचे उद्दिष्ट अंतर्देशीय जलमार्गांच्या विकासाला चालना देणे आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

India Semicon 2.0 Scheme : भारताची 1.27 लाख कोटींची सेमीकॉन योजना

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशात चिप निर्मितीच्या संपूर्ण यंत्रणेला प्रोत्साहन देण्यासाठी 1.27 लाख कोटी रुपये

Gold Rate Today : ग्राहकांना सोन्यासारखी संधी! बाजारात सोन्याचे दर घसरले; पहा तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्यातच सोन्याच्या दरात सलग

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

India-Chile CEPA : भारत-चिली सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या वाटाघाटींना वेग; वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी चिलीच्या उपमंत्री पॉला एस्तेव्हेझ वाइनस्टीन यांची घेतली भेट

नवी दिल्ली : भारत-चिली सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या वाटाघाटींना पुढे नेण्यासाठी वाणिज्य सचिव राजेश

Union Budget 2027-28 : केंद्रीय अर्थसंकल्प २०२७-२८ साठी १२ ऑक्टोबरपासून तयारी सुरू करणार, केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिली माहिती

नवी दिल्ली : देशाचे अर्थ मंत्रालय पश्चिम आशियातील संकट आणि वाढत्या जागतिक अनिश्चितता तसेच अन्न व इंधनाच्या