नवव्या अर्थसंकल्पात स्थैर्य, वृद्धी, अर्थव्यवस्थेला दिशा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भाषणाच्या रचनेतही बदल

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी संसदेत सलग ९ वा अर्थसंकल्प सादर केला. १ तास २५ मिनिटांच्या या भाषणाने केवळ देशाच्या अर्थव्यवस्थेची दिशा स्पष्ट केली नाही, तर ७५ वर्षांपासून चालत आलेली एक मोठी संसदीय परंपराही मोडीत काढली. भारताचा आर्थिक प्रवास स्थैर्य, वृद्धी आणि मध्यम महागाईच्या मार्गावर असल्याचे सांगत, सीतारामन यांनी यंदा आपल्या भाषणाच्या रचनेत ऐतिहासिक बदल केला आहे. 'पार्ट बी' बनला केंद्रबिंदू भारतीय अर्थसंकल्पाच्या इतिहासात सहसा ‘पार्ट ए’मध्ये धोरणात्मक घोषणा असतात आणि ‘पार्ट बी’मध्ये केवळ कर प्रस्ताव आणि तांत्रिक बाबी असतात. मात्र, यंदा निर्मला सीतारामन यांनी हा पायंडा मोडला. त्यांनी ‘पार्ट बी’ला केवळ कर प्रस्तावांपुरते मर्यादित न ठेवता, भारताच्या भविष्यातील आर्थिक रणनीतीचा मुख्य आधार बनवले. देशाच्या विकासाचा ‘रोड मॅप’ मांडण्यासाठी त्यांनी या भागाचा प्रभावी वापर केला, जे तज्ज्ञांच्या मते भारतीय अर्थसंकल्पातील एक मोठे स्थित्यंतर आहे.

नऊ अर्थसंकल्पांचा प्रवास

निर्मला सीतारामन यांच्या नावावर भारतीय संसदेतील सर्वात प्रदीर्घ भाषणाचा विक्रम आहे. त्यांच्या भाषणाचा प्रवास रंजक राहिला आहे.
२०१९ चा प्रवास : त्यांच्या पहिल्याच पूर्णवेळ अर्थसंकल्पाचे भाषण २ तास १७ मिनिटे चालले होते.
२०२० चा ऐतिहासिक विक्रम : सीतारामन यांनी २ तास ४२ मिनिटे भाषण देऊन विक्रम प्रस्थापित केला होता. त्यावेळी त्यांची प्रकृती काहीशी खालावल्याने अखेरची दोन पाने लोकसभा अध्यक्षांना वाचावी लागली होती.
२०२४ चा 'शॉर्ट' टच : २०२४ चा अंतरिम अर्थसंकल्प हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात लहान (५६ मिनिटे) ठरला होता.
आजची स्थिती (२०२६) : यंदाचे भाषण १ तास २५ मिनिटे चालले, जे गेल्या वर्षीच्या (१ तास १४ मिनिटे) भाषणापेक्षा थोडे लांब होते.

सर्वात लहान आणि शब्दांनी मोठे भाषण

सर्वात कमी शब्दांचे भाषण : १९७७-७८ मध्ये मोरारजी देसाई सरकारमधील अर्थमंत्री हिरूभाई एम. पटेल यांनी केवळ ८०० शब्दांचे सर्वात लहान भाषण दिले होते.
शब्दांच्या बाबतीत सर्वात मोठे : १९९१ मध्ये मनमोहन सिंग यांनी दिलेले १८,६५० शब्दांचे भाषण आजही 'वर्ड काउंट'च्या बाबतीत अव्वल आहे.
अरुण जेटलींची नोंद : २०१८ मध्ये माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १८,६०४ शब्दांचे दुसरे सर्वात मोठे भाषण दिले होते.
Comments
Add Comment

Gold Silver Rate Today : सोनं-चांदीच्या दरात पुन्हा घसरण ! ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांना दिलासा

Gold Silver Rate Today : सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या

Gold Rate Today : आनंदाची बातमी ! सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचे भावही उतरले

Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात गुरुवार, 15 ऑक्टोबर रोजी मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून

Gold Silver Rate Today : जळगावच्या सुवर्ण बाजारात सोने-चांदी स्वस्त ! सलग तिसऱ्या दिवशी दर घसरले, पाहा आजचे भाव

Gold Silver Rate Today : जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या दरातील घसरण सलग तिसऱ्या दिवशीही कायम राहिली. बुधवारी

Share Market News: इन्वेस्टर्ससाठी आनंदाची बातमी, सेन्सेक्स तब्बल 1109 अंकांनी वधारला; आयटी शेअर्सची तुफान फटकेबाजी

मुंबई: भारतीय शेअर बाजारात मंगळवारी अभूतपूर्व तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1109.10 अंकांनी

Gold Rate Today : जळगावच्या सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात घसरण, ग्राहकांना दिलासा

Gold Rate Today : जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सलग दोन दिवस दरवाढ झाल्यानंतर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी

मृत्युपत्र कसे बनवावे? का आहे महत्त्वाचे आणि त्यासाठी किती खर्च येतो, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

आयुष्याच्या अनपेक्षित वळणावर आपल्या पश्चात कुटुंबात मालमत्तेवरून वाद होऊ नयेत, असे वाटत असेल तर 'मृत्युपत्र' हा