दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षेपूर्वी ताण हटणार !

यवतमाळ : दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यांत होत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यास व परीक्षेसंदर्भातील अडचणी, शंका किंवा समस्या दूर करण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तज्ज्ञ समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी योग्य मार्गदर्शन मिळावे, तणावमुक्त होता यावे या उद्देशाने हे समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आले आहे.


बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी तज्ज्ञ समुपदेशकांची मदत घेता येईल. विद्यार्थ्यांनी परीक्षेला सकारात्मक मानसिकतेने आणि तयारीसह सामोरे जाणे आवश्यक आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भातील शंका मिटविण्यासाठी तज्ज्ञ समुपदेशकांचे संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत.


यासाठी राज्य बोर्डाने ही हेल्पलाइन सुविधा सुरू केली आहे. दहावीच्या परीक्षेसंदर्भात माहिती व मार्गदर्शनासाठी (०२२-२७८९३७५६) तर बारावीच्या परीक्षेसंदर्भात माहिती व मार्गदर्शनासाठी (०२२-२७८८१०७५) हे क्रमांक दिले आहेत.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी