उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकत्व

मुंबई : बारामती येथे विमान दुर्घटनेत अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची धुरा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर देण्यात आली. त्यानंतर आता पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. याबाबतचा अधिकृत आदेश मंगळवारी काढण्यात आला.


अजित पवार यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री म्हणून राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्यांक आणि औकाफ, तसेच क्रीडा युवक कल्याण ही खाती देण्यात आली. दरम्यान, अजित पवार हे पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर या जिल्ह्यांचे पालकत्व कोणाकडे जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. अपेक्षेप्रमाणे पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. यामुळे अजित पवार यांच्याकडे असलेल्या जबाबदाऱ्या पुढे नेण्याची जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांच्यावर आहे.


बीड जिल्ह्यात घडलेल्या वादग्रस्त घटनांनंतर अजित पवार यांनी स्वतःकडे या जिल्ह्याचे पालकत्व घेतले होते. त्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्यातील दौरे वाढवले होते. बीडसह पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न सुरू केले होते. तसेच बीड जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अजित पवार यांनी ठोस पावले उचलली होती.

Comments
Add Comment

पुरूष क्रिकेटपटूंनाही जे जमलं नाही, ते स्मृती मंधाना करणार! फक्त 133 धावा करताच रचणार ऐतिहासिक महाविक्रम

[caption id="attachment_1066855" align="aligncenter" width="800"] भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या

Nashik News : सरकारी कार्यालयातच महिला अधिकाऱ्याने संपवलं जीवन , नाशिकमध्ये खळबळ

Malegaon News : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मालेगाव शहरातील सहकार निबंधक कार्यालयातील

Rajya Natya Spardha : राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांना २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धांना

Gold Silver Rate Today : सोनं-चांदीच्या दरात पुन्हा घसरण ! ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांना दिलासा

Gold Silver Rate Today : सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धकांवर उधळली स्तुतीसुमनं! बेबी बॉस वैभव सूर्यवंशीची अशी होती रिॲक्शन Video

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारताने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. या स्पर्धेत भारताने एकूण 85 पदकं मिळवून चौथं

Ranbali Movie Review : कागदावर धमाकेदार, पण पडद्यावर फिका? 'रणबाली' चित्रपट कसा आहे ?

साऊथचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाच्या (Vijay Devarkonda) बाबतीत एकच गोष्ट वारंवार घडताना दिसते. त्याच्या एखाद्या