रस्त्यावर थुंकल्यास, कचरा टाकल्यास होणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ

महापालिकेने नव्याने स्वच्छता उपविधी तयार


दंडाची रक्कमेची आकारणी २ फेब्रुवारीपासून अमलात


मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून घनकचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी), स्वच्छता आणि स्वच्छताविषयक उपविधी - २०२५ जारी करण्यात येत आहे. यामध्ये कचरा निर्माण करणारे घटक, विविध आस्थापना, कचराविषयक सेवा प्रदाता; घनकचरा व्यवस्थापन, साठवणूक, वितरण व प्रक्रिया, आदींबाबत नियमावलींचा समावेश आहे. नागरिक किंवा आस्थापनांनी यासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या अंतर्गत, सार्वजनिक स्थळी थुंकल्यास , कचरा टाकल्यास , ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास तसेच , विनापरवाना राडारोडा वाहतूक केल्यास आकारण्या येणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. याची आकारणी २ फेब्रवारीपासून झाली आहे.


मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली मुंबईतील परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नियमितपणे कार्यवाही केली जाते. यासह वेळोवेळी विशेष स्वच्छता मोहीम आणि उपक्रमांचे आयोजन केले जाते. याच पार्श्वभूमीवर, ही स्वच्छता उपविधी जारी करण्यात येत आहे.


मुंबईतील घनकचऱ्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून अविरतपणे प्रयत्न केले जात आहेत. याच अनुषंगाने, मुंबई महानगरात निर्माण होणाऱ्या किंवा आणल्या जाणाऱ्या ओल्या व सुका कचऱ्याचे वर्गीकरण व प्रक्रिया यासंबंधी सर्व बाबींचे नियमन करण्याच्या हेतुने तसेच केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व वातावरणीय बदल विभागाने जारी केलेल्या घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ च्या पार्श्वभूमीवर, मुंबईमहानगरपालिकेकडून घनकचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी), स्वच्छता आणि स्वच्छताविषयक उपविधी -२०२५ जारी करण्यात येत असल्याचे अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी स्पष्ट केले.


उपविधीतील नियम कचरा निर्माण करणारे सर्व व्यक्ती, सार्वजनिक व खासगी ठिकाण; निवासी, व्यापारी, वाणिज्यिक, व्यावसायिक, औद्योगिक, शासकीय, निमशासकीय, प्रशासकीय, शैक्षणिक, धार्मिक, मनोरंजनात्मक, सामाजिक तसेच इतर सर्व प्रकारच्या वापराच्या स्थळांसाठी लागू असतील.


विविध प्रकारच्या २१ उपविधींबाबत दंडात्मक कारवाई अशी असेल (कंसात दंडाची रक्कम रुपयांमध्ये )


रस्ते / गल्ल्या / पदपथ / बाग / सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे ( ५००),


थुंकणे ( २५०),


खुल्या आणि सार्वजनिक जागांवर आंघोळ ( ३००),


लघवी करणे (५००),


शौच करणे (५००),


मोकळ्या जागी व सार्वजनिक ठिकाणी प्राणी किंवा पक्ष्यांना खाद्य देणे (५००),


सार्वजनिक ठिकाणी भांडी / कपडे/ इतर कोणत्याही वस्तू धुणे (३००),


वाहन धुणे (५००),


अंगण स्वच्छ न ठेवणे (एकाच जागेच्या मालकांसाठी / रहिवाशांसाठी (५००) आणि इतरांसाठी (१५००),


कचरा वर्गीकरण न करता व स्वतंत्र डब्यांमध्ये साठवून न ठेवता सुपूर्द केल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी (वैयक्तिक २०० आणि मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती करणाऱ्यांसाठी १०००),


अनधिकृत किंवा नियुक्त नसलेल्या ठिकाणी बांधकाम व पाडकाम कचरा अस्ताव्यस्तपणे टाकणे (प्रतिवाहन २०,०००),


विनापरवाना बांधकाम व पाडकाम कचऱ्याची वाहतूक करणे (प्रतिवाहन २५,०००),


सुका कचरा स्वतंत्रपणे वेगळा करून न देणे (२००),


बागेतील कचरा व झाडांची छाटणी निर्दिष्ट केल्याप्रमाणे न करणे (२००),


व्यावसायिक कारणांसाठी / मोठ्या प्रमाणात कचरा जाळणे (१०,०००);


मासे, कुक्कुटपालन आणि मांसविषयक कचरा स्वतंत्रपणे वर्गीकरण करुन न देणे (७५०),


कंटेनर/कचरा टोपली/ कचरापेटी नसलेले विक्रेते /फेरीवाल्यांसाठी (७५०),


कचरा स्वतंत्रपणे वर्गीकरण करुन न देणारे विक्रेते/ फेरीवाले (७५०),


घरासमोरील गटार (घराचा नाला) स्वच्छ न ठेवणे (५००),


पाळीव प्राण्यांनी कचरा पसरवणे/शौच करणे (१०००),


सार्वजनिक मेळावा/ कार्यक्रमानंतर ४ तासांच्या आत स्वच्छता न करणे (स्वच्छता ठेव जप्त करणे) या उपविधींचा समावेश आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने