मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प येत्या २०ते २३ फेब्रुवारीला?

महापालिका प्रशासनाला नव्या स्थायी समिती अध्यक्षांची प्रतीक्षा


मुंबई : मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७चा अर्थसंकल्प यंदा पाच फेब्रुवारी रोजी मांडला जाणार नसून यंदा हा अर्थसंकल्प येत्या २० ते २३ फेब्रुवारी रोजी मांडला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षांची निवड झाल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी हे नवनियुक्त स्थायी समिती अध्यक्षांना महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करतील,अशी माहिती मिळत आहे.


मुंबई महापालिकेचा सन २०२५-२६चा ७४ हजार ४२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प यापूर्वी प्रशासक डॉ भूषण गगराणी यांनी मांडला होता. परंतु आता महापालिका निवडणूक प्रक्रिया पार पडून नगरसेवकांची निवड झाली आहे. त्यामुळे नगरसेवक निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी प्रत्यक्षात महापौरपदाची निवडणूक लांबल्याने स्थायी समिती अध्यक्षांचीही निवड लांबणीवर पडली आहे. त्यामुळे आजवरच्या परंपरेनुसार ५ फेब्रुवारीपूर्वी महापालिकेचा आगामी अर्थसंकल्प सादर होणे आवश्यक असते, त्यानुसार आगामी सन २०२६-२७चा अर्थसंकल्प कुणाला सादर करावा यावरून निर्माण झालेल्या तिढ्यावर महापालिका प्रशासक डॉ भूषण गगराणी यांनी याबाबत अधिनियमांमध्ये कुठेही स्पष्टता नसल्याने स्थायी समिती अध्यक्षांची निवड झाल्यानंतरच अर्थसंकल्प सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.


त्यानुसार येत्या ५ फेब्रुवारीपूर्वी महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला जाणार नसून स्थायी समिती अध्यक्षांची निवड झाल्यानंतरच म्हणजे येत्या २० ते २३ फेब्रुवारी दरम्यान कधीही अर्थसंकल्प सादर केला जावू शकतो,अशी माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा आकडा ७४,४२७ कोटी रुपयांपर्यंत असला तरी भविष्यात याचा कितीही काटकसर केली तरी वाढलाच जाण्याची शक्यता आहे. महापालिकेने सुमारे २ लाख ३३ हजार कोटींहून अधिक विकास प्रकल्पांची कामे हाती घेतली आहेत. ही कामे सुरु असून त्यातील काही कामे पूर्णत्वास तर काही प्रगतीपथावर असल्याने यासाठी होणारा खर्च लक्षात घेता या आकार वाढला जाण्याची शक्यता आहे. मात्र, हा खर्च वाढला जाणार असला तरी भविष्यात महसूलाच्या दृष्टीकोनातून अधिक विचार होण्याचीही शक्यता असल्याने महापालिकेच्यावतीने करवाढ आणि दरवाढीचा तसेच अन्य मार्गाने महसूल वाढण्याचा विचार महापालिका प्रशासनाला करावा लागणार असल्याचेही समजते.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने