महाराष्ट्रासाठी रेल्वेची २३ हजार कोटी रुपयांची विक्रमी अर्थसंकल्पीय तरतूद

मुंबई : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय तरतुदीबाबत सोमवारी माहिती देताना सांगितले की, सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी २३ हजार ९२६ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे.


ही रक्कम २०१४-१५ ते २०१९-२० या काळात महाराष्ट्राला दरवर्षी दिलेल्या सरासरी १,१७१ कोटी रुपयांच्या तरतुदीपेक्षा जवळपास २० पट जास्त आहे. अर्थसंकल्पात सात हाय-स्पीड रेल प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे, त्यापैकी २ नवीन बुलेट ट्रेन कॉरिडॉर महाराष्ट्रात आहेत. मुंबई-पुणे: ४८ मिनिटे, पुणे-हैदराबाद: १ तास ५५ मिनिटे (२ तासांच्या आत) यांचा समावेश आहे.


पायाभूत सुविधांमध्ये १ लाख ७० हजार ०५८ कोटी रुपयांची एकूण कामे प्रगतीपथावर आहेत. या मोठ्या गुंतवणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात रेल्वे मार्ग निर्मिती, स्थानकांचा पुनर्विकास आणि सुरक्षा वाढवण्याच्या कामांचा समावेश आहे. अमृत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील १३२ स्थानकांचा संपूर्ण पुनर्विकासासाठी निवड करण्यात आली आहे.


प्रीमियम ट्रेन सेवांच्या संचालनामुळे राज्यातील प्रवासाची कार्यक्षमता नवीन उंचीवर पोहोचली असून वंदे भारत एक्सप्रेस(१२ जोड्या),अमृत भारत एक्सप्रेस(५ जोड्या) यांचा समावेश आहे. महाराष्ट्रामध्ये रेल्वे जाळ्याचा वेगाने विस्तार झाला आहे. सन २०१४ पासून, अंदाजे २,४०० किमी लांबीचे रेल्वे मार्ग बांधण्यात आले आहेत. हे मलेशियाच्या संपूर्ण रेल्वे जाळ्यापेक्षा जास्त आहे.


रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी १,२२८ उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग बांधले आहेत. ४९७१ आरकेएम मार्गावर कवच प्रणाली मंजूर आहे, त्यापैकी ५७६ आरकेएमवर ती आधीच कार्यान्वित करण्यात आली आहे आणि ३६१७ आरकेएमचे काम/निविदा प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती वैष्णव यांनी दिली.

Comments
Add Comment

Mumbai Local Train : रेल्वे प्रवासी कृपया लक्ष द्या, रविवारी कुठे मेगाब्लॉक आहे ते जाणून घ्या

मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे

Prakash Abitkar : 'अवयवदानाबाबत राज्यभर व्यापक प्रबोधन मोहीम राबवा'

मुंबई : महाराष्ट्रात मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंमलात आल्यापासून आणि २०११ व २०१४ मधील सुधारित कायद्यांनुसार

BARTI : एमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण अनुसूचित जातीच्या उमेदवारांना ‘बार्टी’कडून १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित

Goregaon Bus Fire : गोरेगाव मेट्रो स्थानकाखाली खासगी बस जळून खाक; धुराच्या लोटांमुळे प्रवाशांची धावपळ

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील गोरेगाव परिसरात आज एक अत्यंत भीषण अपघाताची घटना घडली. गोरेगाव मेट्रो

Dahi Handi in mumbai local train : धावत्या लोकल ट्रेनमध्येच फोडली दहीहंडी! बदलापूर-ठाणे लोकलमध्ये महिला प्रवाशांचा अनोखा गोपाळकाला; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवासात एका अत्यंत अनोख्या आणि आगळ्यावेगळ्या दहीहंडी उत्सवाची दृश्ये समोर

Pratap Sarnaik : स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नये; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवा, प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या नियमबाह्य रिक्षांवर कडक कारवाई करा

मुंबई : नियमबाह्य पद्धतीने रस्त्यावर धावणाऱ्या स्क्रॅप रिक्षा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका आहेत. अशा