गोरेगावात लिफ्टमध्ये हायड्रोजन फुग्यांचा स्फोट; तीन जण थोडक्यात बचावले

मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात हायड्रोजन गॅस भरलेल्या फुग्यांमुळे मोठा धोका निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. गोरेगाव पश्चिमेकडील एका निवासी इमारतीत लिफ्टमधून फुगे नेत असताना अचानक स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली असून तिघे जण किरकोळ जखमी झाले आहेत.


ही घटना गोरेगाव (पश्चिम) येथील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या अनमोल टॉवर इमारतीत घडली. मिळालेल्या माहितीनुसार, एका वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी हायड्रोजन गॅस भरलेले फुगे आणण्यात आले होते. हे फुगे लिफ्टमधून वरच्या मजल्यावर नेत असताना लिफ्टमध्ये अचानक स्फोट झाला.


घटनेच्या वेळी लिफ्टमध्ये एएक फुगेवाला एक तरुण आणि एक तरुणी उपस्थित होती. स्फोट होताच लिफ्टचे दरवाजे आपोआप उघडले गेले आणि तिघांनी तात्काळ बाहेर पडत आपला जीव वाचवला. या घटनेचे दृश्य इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्यामध्ये स्फोटाची तीव्रता स्पष्टपणे दिसून येते.


हायड्रोजन हा अत्यंत ज्वलनशील व स्फोटक गॅस असल्याने बंद जागेत त्याचा वापर केल्यास मोठा धोका संभवतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत गोरेगाव पोलिसांनी संबंधित गॅस फुगे विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.


 


दरम्यान, या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सोसायटी प्रशासन आणि रहिवाशांना अशा धोकादायक प्रकारांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक व बंद जागांमध्ये हायड्रोजन फुग्यांचा वापर टाळावा, असेही सांगण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी