संत तुकाराम

लवण मेळविता जळे
लवण मेळविता जळे। कार्य उरले निराळे॥
तैसा समरस झालो। तुजमाजी हरपलो अग्नी कर्पूराच्या मेळी।
काय उरली काजळी॥
तुका म्हणे होती। तुझी माझी एक ज्योती॥


-  डॉ. देवीदास पोटे


भक्ताचे भक्तीचे परिमाण अतिशय उत्कट अवस्थेला गेले की,, भक्त आणि देव यात वेगळेपण राहत नाही. भक्त देवरूपात विलीन होऊन जातो. त्यांच्यातले द्वैत संपून जाते. ईश्वरभक्तीचा उत्कट भक्तिरंग संत तुकारामांनी या अभंगात व्यक्त केला आहे. ते म्हणतात, "पाण्यामध्ये मीठ मिसळले तर ते पूर्णपणे विरघळून जाते. मिठाचे वेगळे असे अस्तित्व राहत नाही. पाण्यामध्ये मीठ मिसळले आहे याची किंचितही जाणीव पाणी आपल्या मनात ठेवीत नाही. हे विठ्ठला, मी तुझ्या भक्तिरंगात पाण्यातल्या मिठाप्रमाणे पूर्णपणे विलीन झाले आहे, તનામનાભાतनामनाच्या पेशीपेशींनी मी तुझ्यात विरघळून गेलो आहे. तुला पाहिले की, मी म्हणजे तूच होऊन जातो. अग्नीत ज्याप्रमाणे कापूर टाकला की तो कापूर उजळून निघतो आणि त्या अग्नीमध्ये पूर्णपणे एकरूप होऊन जातो. त्याची जराशी सुद्धा काजळी मागे उरत नाही. हे विठुराया, तुझ्या माझ्या अस्तित्वाच्या दोन ज्योती एकरूप होऊन गेल्या आहेत.


दोन वाती एकत्र केल्यावर त्याची एकत्र ज्योत होते आणि प्रज्वलित होऊन प्रकाशाचे तरंग पसरवीत राहते. त्याचप्रमाणे तुझ्या माझ्यातली मी-तू ही वेगळेपणाची जाणीव नाहीशी होऊन आपले एकरूपत्व झाले आहे. आपल्यातला द्वैतभाव पूर्णपणे विसर्जित पावला आहे.
आपल्या दुसऱ्या एका अभंगात हाच आशय व्यक्त करताना यांनी म्हटलंय,


अग्नीमाजी गेले । अग्नी होउन तेच ठेले ।।
लोह लागे परिसा अंगी। तो ही भूषण जाला जगी ।।


एखादा पदार्थ अग्नीत टाकला की तो आग्निरुपच होऊन जातो. लोखंडाला परिसाचा स्पर्श होताच ते जगाला सुवर्णाच्या रूपाने भूषण होते.


रोजच्या दैनंदिन व्यवहारातली उदाहरणे देत, मूळ विषय सोपा करीत उलगडून सांगणे हे संत तुकारामांच्या काव्यशैलीचे वैशिष्ट्य आहे. सर्वसामान्य लोकांना सहज समजेल अशा लोकभाषेत त्यांनी अभंगरचना केली. म्हणूनच त्यांचा अभंगगाथेला 'पाचवा वेद' असे म्हणतात.सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातील सुखदु:खाचे प्रतिबिंब संत तुकारामांच्या अभगवाणीत उमटलेले आहे. म्हणून संत तुकाराम हे लोकांना जवळचे वाटतात. आंतरिक साक्षात्काराची अलौकिक अनुभूती संत तुकारामांनी नेमकेपणाने मांडली आहे.

Comments
Add Comment

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

Navratri 2026: शारदीय नवरात्री का साजरी केली जाते? चैत्र नवरात्रीपेक्षा नेमकं काय वेगळं? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मात नवरात्रीचं विशेष महत्व आहे. या नऊ दिवसात देवीच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा केली जाते. तसं पाहिलं तर

Navratri Kalash: नवरात्रीच्या कलशात काय टाकावं? तुम्ही ही चूक तर करत नाही ना!

शारदीय नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. पितृपक्ष संपला की दुसऱ्या दिवशी घटस्थापना होते. अश्विन महिन्यातील

Sarvapitru Amavasya 2026 : पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहित नाही, ‘हा’ दिवस ठरणार महत्त्वाचा ! संपूर्ण पितृपक्षाचं पुण्य मिळवण्याची विशेष संधी

Sarvapitru Amavasya 2026 : हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील शेवटची तिथी म्हणजेच

Navratri Festival : यंदा नवरात्रीत अष्टमी-नवमी एकाच दिवशी, जाणून घ्या घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंतच्या महत्त्वाच्या तारखा

Navratri Festival : नवरात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भाविकांसाठी यंदाचं नवरात्र विशेष ठरणार आहे. देवीच्या नऊ

Navratri 9 Days Colours 2026: नवरात्रीच्या ९ दिवसांचे रंग कोणते ? पाहा संपूर्ण यादी

Navratri 9 Days Colours 2026: शारदीय नवरात्रौत्सवाला यंदा ११ ऑक्टोबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये