उबाठाच्या खासदाराने EVM चे कौतुक केले, ठाकरेंना तोंडावर पाडले

धाराशिव : EVM मध्ये गडबड असल्याचा आरोप करायचा पण निवडणूक आयोगाने पुरावा मागताच गप्प बसायचे या पद्धतीने मागील काही काळापासून विरोधक वागत आहेत. पण आता विरोधकांचीच कोंडी झाली आहे. उबाठाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ईव्हीएमची पाठराखण केली आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेचे धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर कौतुक केले. या घडामोडींमुळे ईव्हीएम विरोधात बोलणाऱ्या उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची अवस्था तोंडावर पडल्यासारखी झाली आहे.


ढोकी येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ईव्हीएम घोटाळ्याचे आरोप फेटाळले. जर ईव्हीएममध्ये खरोखर घोळ असता तर मी खासदार झालो असतो का? मोदींसाठी लोकसभेची निवडणूक महत्त्वाची होती. मग तिथे घोळ करून मला पाडले नसते का? मी खासदार झालो याचाच अर्थ ईव्हीएममध्ये घोटाळा नाही; असे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले. मतदानाच्या दिवशी ५० मते तपासणे, ७C फॉर्मवरील सिरीयल नंबर नोंदवणे आणि मतमोजणीवेळी तीच मशीन आहे का? याची खात्री करणे. या तीन गोष्टी केल्या, तर ईव्हीएममध्ये घोळ शक्य नाही; असे खासदार ओमराजे निंबाळकर ठामपणे म्हणाले.


ओमराजेंच्या वक्तव्याचा आधार घेत धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी उबाठाला ईव्हीएमच्या मुद्यावर घेरले. ओमराजेंनी सत्य स्वीकारले आहे. आता दररोज सकाळी भोंगा वाजवणाऱ्या संजय राऊतांना सांगा की ईव्हीएममध्ये घोटाळा नाही. तुम्ही स्वतःच्या खासदाराचे तरी ऐका. निवडून आले की ईव्हीएम चांगले आणि पराभव झाला की ईव्हीएममध्ये घोटाळा, अशी दुटप्पी भूमिका आम्ही कधीच घेतली नाही. भाजप आणि शिवसेनेने गडबड केल्याचा आरोप करणे हा प्रकार आता थांबवा; असे प्रताप सरनाईक म्हणाले. त्यांनी जिल्हा परिषदांच्या निवडणुकीनंतर राज्यात लवकरच ऑपरेशन टायगर होणार असल्याचे संकेत दिले. यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण