Sankashti Chaturthi Feb 2026: माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी 5 फ्रेब्रुवारीला, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ







मुंबई: माघ महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी संकष्ट चतुर्थी ( संकष्टी चतुर्थी) आज 5 फेब्रुवारीला (गुरुवार) साजरी केली जाणार आहे. संकष्टी दिवशी गणपती बाप्पाची उपासना केल्यास संकटांचा नाश होऊन सुख-समृद्धी लाभते, अशी धार्मिक मान्यता आहे. द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी ही विघ्नहर्ता भगवान गणेशाच्या द्विजप्रिय स्वरूपाला समर्पित असते. संकष्ट या शब्दाचा अर्थ संकटातून मुक्ती असा होतो. या दिवशी भाविक गणेशाची मनोभावे पूजा करतात, त्यामुळे जीवनातील सर्व अडथळे दूर होऊन इच्छा पूर्ण होतात, असे मानले जाते.


संकष्टी चतुर्थी 2026 वेळ



दृक पंचांगानुसार, चतुर्थी तिथी 5 फेब्रुवारी रोजी उत्तररात्री 12.09 (AM) वाजता सुरू होईल आणि 6 फेब्रुवारी रोजी उत्तररात्री 12.22 (AM) वाजता समाप्त होईल. या दिवशी चंद्र कन्या राशीत असेल. सूर्योदय सकाळी 7 वाजून 13 मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी 6 वाजून 34 मिनिटांनी होईल.


शुभ मुहूर्त



ब्रह्म मुहूर्त: पहाटे 5:22 वाजेपासून ते सकाळी 6:15 वाजेपर्यंत आहे.
अभिजीत मुहूर्त: दुपारी 12:13 वाजेपासून ते 12:57 वाजेपर्यंत आहे.
विजय मुहूर्त: दुपारी 2:25 वाजेपासून ते 3:08 वाजेपर्यंत आहे.
अमृत काळ: दुपारी 3:32 वाजेपासूनते संध्याकाळी 5:11 वाजेपर्यंत आहे.


अशुभ वेळ (राहुकाल)


राहुकाल: दुपारी 1:57 वाजेपासूनते दुपारी 3:19 वाजेपर्यंत आहे.
यमगंड: सकाळी 7:07 वाजेपासून ते सकाळी 8:29 वाजेपर्यंत आहे.
गुलिक काळ: सकाळी वाजेपासून 9:51 ते सकाळी 11:13 वाजेपर्यंत आहे.


पूजा विधी आणि मंत्र



चतुर्थीच्या दिवशी गजाननाला दुर्वा, लाल फुले, मोदक, लाडू आणि दही-साखरेचा नैवेद्य अर्पण करावा. गणपतीला सिंदूर आणि तुपाचा लेप लावणे फलदायी ठरते. पूजेदरम्यान 'गं गणपतये नमः' आणि 'ओम द्विजप्रियाय नमः' या मंत्रांचा जप करावा. तसेच संकष्टनाशन गणेश स्तोत्र आणि गणेश अथर्वशीर्ष पठण करणे शुभ मानले जाते.




















Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''