हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकलमुळे वाहतूक विस्कळीत

मुंबई : हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल सेवा सुरू झाल्यानंतर, प्रवाशांना दररोज लोकलच्या विस्कळीत झालेल्या लोकल वेळापत्रकाला सामोरे जावे लागत आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास सीएसएमटीहून पनवेलला जाणाऱ्या वातानुकूलित लोकलचे दरवाजे विलंबाने लागत असल्याने, प्रत्येक स्थानकात लोकल उशिराने पोहचत होती. तसेच चेंबूर रेल्वे स्थानकादरम्यान आपत्कालीन साखळी ओढल्याने, लोकलचा खोळंबा झाला. परिणामी, संपूर्ण दिवसभर प्रवाशांना लोकलच्या लेटलतीफ कारभाराला सामोरे जावे लागले.


वातानुकूलित लोकलमुळे हार्बर मार्गावरील वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले. आज वातानुकूलित लोकलच्या दरवाज्यात तांत्रिक बिघाड झाल्याने, या लोकलसह इतर सामान्य लोकल विलंबाने धावल्या. गेल्या काही


दिवसांपासून प्रवाशांना हा त्रास सहन करावा लागत होता. तर, आज सकाळी ७.४० वाजता सीएसएमटी-पनवेल वातानुकूलित लोकलचे दरवाजे बंद होण्यास विलंब होत असल्याने, रेल्वे स्थानकात बराच वेळ लोकल उभी राहत होती. वातानुकूलित लोकल स्थानकात येण्यास, दरवाजे खुले होण्यास, पुन्हा हे दरवाजे बंद करण्यास आणि लोकल मार्गस्थ होण्यास बराच वेळ जात होता. यात वेळ खर्ची झाल्याने मागून येणाऱ्या लोकलला विलंब झाला. परिणामी, सर्वसामान्य प्रवाशांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागला. गुरुवारी दुपारी १२.२४ वाजता पनवेल ते सीएसएमटी लोकल सुटली. ही लोकल दुपारी १.१५ च्या सुमारास चेंबुर येथे पोहचली असता, या लोकलची आपत्कालीन साखळी (अलार्म चेन पुलिंग) ओढण्यात आली. त्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल सेवा २० मिनिटे उशिराने धावत होती.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने