Thursday, October 15, 2026

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर अंतिम सामना झाला. या सामना दिल्ली आणि बेंगळुरू या संघांमध्ये झाला असून, बंगळुरूच्या संघाने सामना जिंकून दुसऱ्यांदा WPL चं जेतेपद आपल्या नावावर कोरलं आहे.

अंतिम सामन्यात जेमिमा रॉड्रिग्जच्या दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून स्मृती मानधनाच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने हा सामना ६ विकेट्सने जिंकला आहे.

स्मृती मनधानाची मॅच विनिंग खेळी:

पहिल्या डावात फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स संघाने अंतिम सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. कर्णधार जेमिमा रॉड्रिग्जच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर दिल्लीने २०३ धावांचा डोंगर उभारला. दिल्लीने दिलेल्या लक्षाचे यशस्वी पाठलाग करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ६ विकेट्सने बाजी मारली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने महिला प्रीमियर लीगची दुसऱ्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावली आहे. आरसीबीकडून कर्णधार स्मृती मानधना हिनं ८७ धावांची मॅच विनिंग खेळी केली. जॉर्जिया व्हॉल हिनं ७९ धावांची खेळी केली. या दोघींच्या फलंदाजीच्या जोरावर आरसीबीनं विजेतेपद मिळवलं

जेमिमा रॉड्रिग्जच्या दिल्ली कॅपिटल्सनं सलग चारवेळा अंतिम फेरीत धडक दिली. मात्र, त्यांच्या संघाचं विजेतेपदाचं स्वप्न यंदा देखील पूर्ण होऊ शकलं नाही. डब्ल्यूपीएलच्या चार हंगामात दोनवेळा मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं विजेतेपद पटकावलं आहे.

या सामन्यानंतर आरसीबीची फिरकी गोलंदाज श्रेयंका पाटीलने हा विजय तीन जणांना समर्पित केला: तिची कर्णधार मानधना; आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक मालोलन रंगराजन; आणि आरसीबीचे सहाय्यक प्रशिक्षक अन्या श्रुबसोले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >