Shruti Haasan: "म्हणून आमच्या घरात देवाचे कोणतेही फोटो नाही"; श्रुती हासनने केला अत्यंत मोठा खुलासा

मुंबई: एका मोठ्या तमिळ सुपरस्टारची मुलगी असूनही, श्रुती हासन या अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीत आपली स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्रुती अभिनेत्री सोबतच एक अनुभवी पॅन-इंडिया स्टार देखील आहे. नुकताच तिची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीमध्ये तिने अनेक खुलासे केले आहेत. तिने तिच्या बालपणाविषयी, आई-वडलांविषयी आणि आपल्या नास्तिक असण्याविषयी खुलासा केला आहे.


श्रुती हासनच्या नावावर अनेक लोकप्रिय तेलुगु, तमिळ आणि हिंदी चित्रपट आहेत, ज्यात सलार: भाग १ - युद्धबंदी (२०२३), गब्बर सिंग (२०१२), रेस गुर्रम (२०१४), श्रीमंथुडू (२०१५) सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.



धर्म आणि देव ही संकल्पना आमच्यासाठी अस्तित्वात नव्हती:


अभिनेत्रीने आपल्या कुंटुंबाबद्दल सांगितले की तिचे कुटुंब देवाला मानत नाही. "आम्ही एका नास्तिक, धर्मरहित कुटुंबात वाढलो. मी असे म्हटले तर माझ्या वडिलांना ते आवडत नाही. आमच्या घरी देवाला स्थान नव्हते, तसेच मंगळवारी मांसाहारी जेवण खायला कोणतीच बंधने नव्हती. धर्म आणि देव ही संकल्पना आमच्यासाठी अस्तित्वात नव्हती. म्हणूनच, लहानपणापासूनच, कला हेच देव आहे हे माझ्या मनात रुजले होते."



मी विक्का आणि मूर्तिपूजेवर विश्वास ठेवते: 


श्रुती पुढे म्हणाली की; "जर तुम्ही पप्पांशी ज्योतिषाबद्दल बोललात तर ते तुम्हाला पळवून लावतील. तोे खूप सर्जनशील आणि व्यावहारिक आहे. त्यांना टॅटूही आवडत नाहीत. ते त्यांचा तिरस्कार करतात." तिने पुढे सांगितले की ती विक्का (निसर्ग देवतांची पूजा) वर विश्वास ठेवते. "आमचे पूर्वज महिला होत्या. म्हणूनच मी विक्का आणि मूर्तिपूजेवर विश्वास ठेवते. आम्ही अशा चेटकिणींची नातवंडं आहोत ज्यांना जाळता येत नव्हते. मला वाटते की त्यांचे रक्त माझ्या नसांमध्ये वाहते."



माझे आईवडील कधीच शाळेत आले नाहीत’:


श्रुतीचे आईवडील दोघेही अभिनेते आहेत हे लक्षात घेता, तिचे बालपण एक वेगळे आणि मनोरंजक होते. श्रुती त्याला ‘असामान्य’ बालपण म्हणते. “माझ्या वडिलांच्या आणि आईच्या कारकिर्दीमुळे ते मजेदार होते, ते रोमांचक होते. त्या अर्थाने माझे बालपण एक असामान्य होते. जसे की, आम्ही चित्रपटांच्या सेटवर वाढलो. तुम्ही पाच वर्षांचे असता तेव्हा ते खूपच छान असते. आम्ही सर्व मोठ्या कलाकारांना भेटायचो, प्रवास करायचो आणि अद्भुत ठिकाणे पाहायचो.”

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’