Pune Mayor Election 2026: पुण्यात महापौर, उपमहापौर पदासाठी बिनविरोध निवडणूक

पुणे: भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची पुण्याच्या महापौर पदी, तर भाजप-रिपब्लिकन पक्षाचे परशुराम वाडेकर यांची उपमहापौर पदी आज म्हणजेच सोमवार ९ फेब्रुवारी रोजी बिनविरोध निवड झाली आहे.


कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार पुणे महापालिकेत सकाळी सव्वा अकरा वाजता महापौर आणि उपमहापौर निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. यावेळी भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते यांना केली.


दरम्यान, साडे अकरा वाजण्याच्या सुमारास उमपहौर पदाच्या निवडीसाठीची प्रक्रिया सुरू झाली. काँग्रेसकडून साहिल केदारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दत्ता बहिरट, तर भाजपकडून परशुराम वाडेकर यांचे अर्ज वैध ठरले. त्यानंतर बहिरट व केदारी यांनी उपमहापौर पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे उपमहापौर पदी भाजप रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर वाडेकर यांची उपमहापौर म्हणून निवड करण्यात आली.


केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नागपुरे व वाडेकर यांची सभागृहात उपस्थित राहून अभिनंदन केले.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण