ZP Election Result 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप महायुतीचा दणदणीत विजय

सिंधुदुर्ग: राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ७३१ जिल्हा परिषद जागांपैकी पहिल्या २०० जागांचे कल हाती आले असून, यामध्ये सत्ताधारी महायुतीने स्पष्ट वर्चस्व मिळवल्याचे दिसून येत आहे. शनिवारी पार पडलेल्या या मतदानामध्ये ७ हजार ४३८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले होते. या निवडणुकीत भाजप मोठा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत भाजप शंभरी पार गेला.


अशातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्याचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये भाजप महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. जिल्ह्यातील ५० जागांपैकी ३६ जागांचा निकाल जाहीर झाला असून भाजपाला २१ जागा, शिवसेनेला ८, उबाठा २ जागा तर इतर ५ जागांवर आघाडी घेतली आहे.


भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे आता देवगड तालुक्यात भाजपा महायुतीने आपली मजबूत पकड कायम ठेवत यश संपादन केले आहे.



विजयी उमेदवारांची नावे:


पुरळ जिल्हा परिषद गट संजय बोबडी (भाजप - महायुती)


पुरळ पंचायत समिती गण संजना आळवे (भाजप महायुती)


तिरलोट पंचायत समिती गण रवी तिरलोटकर (भाजप महायुती)


शिरगाव जिल्हा परिषद गट देवदत्त दामोदर कदम (भाजप महायुती)


तळवडे पंचायत समिती गण सलोनी संतोष तळवडेकर (शिवसेना - महायुती)

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण