Budget Session: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन यंदा महिनाभर चालणार; वेळापत्र निश्चित

६ मार्चला अर्थसंकल्प सादर होणार


मुंबई: अधिवेशनात बोलू दिले जात नसल्याची तक्रार अनेक आमदार, विशेषतः नवीन आमदार करीत असतात. यंदा मात्र त्यांना तसे बोलण्याची मुभा मिळणार नाही. कारण, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन यंदा महिनाभर चालणार आहे. मंगळवारी (१० फेब्रुवारी) त्याबाबतच्या वेळापत्रकावर शिक्कामोर्तब करण्यात आले.


महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून राज्याचा सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प ६ मार्च रोजी विधानसभेत सादर केला जाणार आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाज सल्लागार समित्यांच्या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशन दि. २३ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. विधान परिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह सर्व पक्षांचे गटनेते या बैठकीला उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर कोणतेही शासकीय कामकाज न करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पहिल्या दिवशी अजित पवार यांच्याबाबत दोन्ही सभागृहात शोकप्रस्ताव संमत करण्यात येणार असून यावेळी प्रत्येक पक्षांचे गटनेते आणि तीन सदस्यांना सभागृहात बोलण्याची संधी देण्यात येणार आहे. तर, मुख्यमंत्री फडणवीस दुसऱ्या दिवशी पुरवणी मागण्या आणि अर्थसंकल्प ६ मार्च रोजी मांडतील.

Comments
Add Comment

India Semicon 2.0 Scheme : भारताची 1.27 लाख कोटींची सेमीकॉन योजना

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशात चिप निर्मितीच्या संपूर्ण यंत्रणेला प्रोत्साहन देण्यासाठी 1.27 लाख कोटी रुपये

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात ९०३ जणांचा मृत्यू, ४२४७ बेपत्ता; मदतकार्य सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि मदतकार्य सातत्याने सुरू आहे.

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार