Eknath Shinde: सलमान खान भारतीय नागरिक, आरएसएसच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला तर त्यात गैर काय..?

मुंबई: सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर राज्यात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले परखड मत व्यक्त केले.


पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राष्ट्रभक्त आणि देशभक्त संस्था असून गेल्या शंभर वर्षांपासून देशात कार्यरत आहे. आपत्ती आली त्या ठिकाणी संघ नेहमीच पुढे असतो. संघाच्या कार्यकर्त्यांच्या कणाकणात राष्ट्रभक्ती भरलेली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.


ते पुढे म्हणाले, संबंधित कार्यक्रम मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. सलमान खान हा भारताचा नागरिक असून तो येथील परंपरा आणि संस्कृती मान्य करतो. त्यामुळे कार्यक्रम मुंबईत असताना त्याने उपस्थित राहण्यात गैर काय आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.



सलमान खान हा उद्धव ठाकरेंपेक्षा चांगला हिंदू: नितेश राणे 


या मुद्द्यावर कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनीदेखील आपले मत मांडले आहे. ते म्हणाले की; “सलमान खान हा उद्धव ठाकरेंपेक्षा चांगला हिंदू आहे. उद्धव ठाकरे खरेच हिंदू आहेत का, हे तपासण्याची वेळ आली आहे. सलमान खानने किमान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची हिंमत दाखवली. पण, उद्धव ठाकरे कधी राहुल गांधींच्या समोर स्वतःच्या वडिलांना हिंदुहृदयसम्राट म्हणण्याची हिंमत दाखवतील का, हे उद्धव किंवा संजय राऊतांना विचारा”, असा हल्लाबोल राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी केला.



संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले नसल्याने पोटदुखी: मुख्यमंत्री


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या कार्यक्रमावर राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले. “ज्यांना निमंत्रण मिळाले नाही, त्यांना त्याचे वाईट वाटत आहे. त्यामुळे ज्यांना निमंत्रण मिळाले, त्यांच्यावर टीका केली जात आहे. संघाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर समाजातील विविध क्षेत्रांतील लोकांना संघाबाबत स्पष्ट माहिती मिळावी, वाद-अपवाद दूर व्हावेत, यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.