विद्यापीठांमधील अध्यापक भरती प्रक्रियेस मान्यता; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

भरतीची सविस्तर कार्यपद्धती जाहीर


मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या सार्वजनिक विद्यापीठांमधील अध्यापक भरतीची  संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी, यासाठी  उमेदवारांना मिळालेल्या गुणदानाची यादी त्यांच्या गुणांसह विद्यापीठांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाणार आहे. अशा विविध अनुषंगिक नाविन्यपूर्ण बदलांचा समावेश करून भरतीची सविस्तर कार्यपद्धती जाहीर करून भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात आली आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील  यांनी सांगितले.


उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, सहाय्यक प्राध्यापक पदासाठी तासिका  तत्वावरील, कंत्राटी तसेच ॲडहॉक तत्वावर कार्यरत असणाऱ्या सहाय्यक प्राध्यापकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या कालावधीत केलेल्या कामाचा अनुभव ग्राह्य धरला जाणार आहे. अनेक सहाय्यक प्राध्यापक जे वर्षोनुवर्षे तासिका, कंत्राटी आणि ॲडहॉक तत्वावर काम करतात अशांचा अनुभव पात्रतेसाठी ग्राह्य धरला जाणार आहे.


तसेच पूर्वीच्या शासन निर्णयामधील मानवविज्ञान शाखेअंतर्गत प्राध्यापकांसाठी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी प्रकाशनसाठी स्कोपस, वेब ऑफ सायन्स मध्ये प्रकाशनाची जी अट होती, ती या शासन निर्णयामुळे काही अंशी  शिथिल करण्यात आली. मानवविज्ञान शाखेतील प्राध्यापकांसाठी ही जमेची बाजू ठरली आहे. या शाखेत कार्यरत असणाऱ्या अध्यापकांचे पुस्तक प्रकाशनांचेही गुण ग्राह्य धरले जाणार असून समान संधीच्या तत्वाचा अवलंब करण्यात आला आहे. मात्र हे करत असताना उत्कृष्टतेलाही प्राधान्य देण्यात आले आहे. मागील शासन निर्णयाच्या तुलनेने एनआयआरएफ, क्युएस आणि टाईम्स हायर एज्युकेशन अशा अनुषंगिक रँकिंगच्या नुसार गुणदानातही सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील उमेदवारांना समान संधीच्या तत्वामुळे या शासन निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.


सहाय्यक आणि प्राध्यापक पदासाठीही त्यांचे अनुभव, विविध संशोधन प्रकल्प, विविध शिखर संस्थांकडून मिळालेला निधी आदी निकषांवर भर देण्यात आला आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अपेक्षित अध्ययन आणि अध्यापन पध्दतीत शिक्षकांची भूमिका ही महत्वाची असल्याने भरती प्रक्रिये दरम्यान मुलाखतीसाठी गुणदानाची प्रक्रिया विषद करण्यात आली आहे. यामध्ये अध्यापकांना आयसीटी कौशल्य, प्रगत तांत्रिक कौशल्य आणि को-करिक्युलर एक्टीव्हिटीज यास महत्व देत कार्यपध्दती निश्चित करून अध्यापकांची निवडप्रक्रिया पूर्ण करण्यास मान्यता देण्यात आली आहे, असेही मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले. शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने