भारतातील पहिला संगीत मार्ग मुंबईकरांच्या सेवेत

कोस्टल रोड प्रमाणे संगीत मार्गाची संकल्पना यापुढेही राबवणार


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्गावर (मुंबई कोस्टल रोड) साकारण्यात आलेली संगीत रस्त्याची संकल्पना वाहनधारकांना आनंद देणारी आहे. हंगेरियन तंत्रज्ञानावर आधारित ही अभिनव संकल्पना यापुढेही राबविण्याचा मानस आहे, असे उद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. तर समृद्धी महामार्गावरही प्रायोगिक तत्त्वावर ही संकल्पना राबविण्याचा विचार करू.मुंबई किनारी रस्त्यावर साकारलेल्या संगीत मार्गाचा मुंबईकरांनी आनंद घ्यावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


मुंबई किनारी रस्त्यावर नरिमन पॉईंटकडून वरळीकडे जाणाऱ्या उत्तर मार्गिकेवर साकारलेल्या संगीत मार्गाचे (मेलोडी रोड) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज बुधवारी ११ फेब्रुवारी २०२६ रोजी लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी वाहनात बसून ‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटातील ‘जय हो’ या गीताची धून ऐकत संगीत मार्गाचा आनंद घेतला.
हंगेरीचे वाणिज्य दूत फॅरेन जारी, माजी खासदार राहुल शेवाळे, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.


मुंबई किनारी रस्त्यावर नरिमन पॉईंटकडून वरळीकडे जाणाऱ्या उत्तर मार्गिकेवर संगीत पट्टे बसविण्यात आले आहेत. या पट्ट्यांवरून वाहन गेल्यावर ‘जय हो’ हे गाणे ऐकू येते. हा जगातील पाचवा आणि भारतातील पहिलाच प्रयोग आहे. माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम साकारण्यात आला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई किनारी रस्त्यावरील पहिल्या टप्प्यात ५०० मीटर अंतराच्या रस्त्यावर ही संकल्पना राबविण्यात आली आहे. यापुढेही संगीत मार्ग ही संकल्पना राबविण्याचा मानस आहे.


यानंतरही अशाप्रकारे संगीत मार्ग साकारण्यात...


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सध्या मुंबई किनारी रस्त्यातील ५०० मीटर अंतरावर संगीत पट्ट्या बसविण्यात आल्या आहेत. यानंतरही अशाप्रकारे संगीत मार्ग साकारण्यात येतील. समृद्धी महामार्गावरही प्रायोगिक तत्त्वावर ही संकल्पना राबविण्याचा विचार करू. मुंबई किनारी रस्त्यावर साकारलेला संगीत मार्ग मुंबईकरांच्या मनात देशभक्ती जागृत करणारा आहे. हा भारतातील पहिलाच संगीत रस्ता, असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने