मुलुंड स्टेशन परिसरातील एस व्ही पी मार्ग क्लिअर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुलुंड (पश्चिम) येथील सरदार वल्लभभाई पटेल मार्गावरील ६१ अनधिकृत बांधकामे मुंबई महानगरपालिकेच्या ‘टी’ विभागाकडून बुधवारी ११ फेब्रुवारी २०२६ रोजी कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर सुमारे ११०० चौरस मीटर परिसर मोकळा झाला. यामुळे मुलुंडचा एस व्हि पी मार्ग क्लिअर झाला आहे.


मुंबई महापालिका उपायुक्त (परिमंडळ-६) संतोषकुमार धोंडे यांच्या देखरेखीत, सहायक आयुक्त (टी विभाग) योगिता कोल्हे यांच्या नेतृत्वात ‘टी’ प्रशासकीय विभाग अंतर्गत कार्यरत विविध विभागांकडून संयुक्तपणे ही कारवाई हाती घेण्यात आली होती. या मार्गावरील अनधिकृत बांधकामावरोधात महापालिकेकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, तसेच लोकप्रतिनिधीही अनधिकृत बांधकामे हटवण्याबाबत आग्रही होते.


या कारवाईत ०४ जेसीबी, ०७ डम्पर आणि अन्य मशीनची मदत घेण्यात आली. या कारवाईदरम्यान महानगरपालिकेचे ७० अधिकारी-कर्मचारी यांच्यासह पुरेसा पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला होता. दरम्यान, यापुढेही अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाई सुरूच राहील, असे महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.

Comments

Santosh Mohite    February 12, 2026 06:43 AM

Good Job

Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर