NCMC Card: एनसीएमसी कार्ड असेल तरच मिळणार एसटी बस प्रवासात सवलत; जाणून घ्या एनसीएमसी कार्ड बद्दल

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांना पारदर्शक आणि सोयीस्कर सेवा देण्यासाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच 'एनसीएमसी' लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री आणि राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी आता हे स्मार्ट कार्ड आवश्यक असेल.



एनसीएमसी कार्ड अनिवार्य:


हा केवळ तांत्रिक बदल नाही तर प्रवाशांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी उचलेलं एक पाऊल आहे. हे कार्ड सवलती, कॅशलेस पेमेंट आणि पारदर्शक प्रणालीचे अचूक रेकॉर्ड सुनिश्चित करेल. या प्रकल्पासाठी एसटीने एबिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि एनएसडीएल पेमेंट्स बँकेसोबत भागीदारी केली आहे.सर्व डेपोमध्ये लवकरच नोंदणी मोहीम सुरू होईल. प्रताप सरनाईक यांच्या घोषणेनंतर, आता प्रत्येकाकडे हे कार्ड असणे आवश्यक असेल.



कोणाला मिळणार एनसीएमसी कार्ड ?


मिळालेल्या माहितीनुसार, या नवीन योजनेत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवाशांचा समावेश आहे. अपंग प्रवासी, स्वातंत्र्यसैनिक, मान्यताप्राप्त पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना एनसीएमसी कार्ड दिले जातील. विद्यार्थ्यांचे कार्ड त्यांच्या शाळेच्या क्रमांकाशी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचे कार्ड त्यांच्या आधार क्रमांकाशी आणि अपंग प्रवाशांचे कार्ड त्यांच्या UDID क्रमांकाशी जोडले जातील. या कार्डची किंमत ₹१९९ आहे (GST सह), परंतु जुने स्मार्ट कार्ड सादर केल्यावर ते ₹१४९ मध्ये उपलब्ध असेल.



प्रवास सोपा आणि सुरक्षित होण्याकडे भर:


कार्डमध्ये किमान १०० रुपये शिल्लक असणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्ही ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज करू शकता. हा रिचार्ज तुम्हाला ईटीआयएम मशीन, वेबसाइट, मोबाईल अॅप किंवा अधिकृत एजंटद्वारे करता येईल. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी ३,००० हून अधिक एजंट नियुक्त करण्यात आले आहेत. तर ग्रामीण भागातील प्रवाशांनाही बसस्थानकावर नोंदणी करण्याच्या सुविधेचा फायदा होईल. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या (एसटी) या उपक्रमामुळे प्रवास सोपा आणि सुरक्षित होईल.


Comments
Add Comment

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि