रायगड जिल्ह्यात १५ दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट

जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाही


रायगड: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, २०१७ अन्वये जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षातील १५ दिवस ध्वनीवर्धक (स्पीकर) व ध्वनीक्षेपक वापरास सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत सूट देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रायगड, किशन जावळे यांनी १ जानेवारी २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत १५ दिवसांकरिता ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरास सूट दिल्याची अधिसूचना जारी केली आहे.


या आदेशानुसार श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे व मेजवानी कक्ष यांसारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी ध्वनीची विहित मर्यादा पाळून सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.


सूट देण्यात आलेले दिवस : शिवजयंती १९ फेब्रुवारी (१ दिवस), होळी पौर्णिमा २ मार्च (१ दिवस), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल (१ दिवस), ईद-ए-मिलाद २६ ऑगस्ट (१ दिवस), गणपती उत्सव १५ सप्टेंबर (दुसरा दिवस), १९ सप्टेंबर (गौरी विसर्जन), २५ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी) ३ दिवस, गणपती (साखरचौथ विसर्जन) ३० सप्टेंबर (१ दिवस), नवरात्री उत्सव १७ ते २० ऑक्टोबर (४ दिवस), दिवाळी (लक्ष्मीपूजन) ८ नोव्हेंबर (१ दिवस), ख्रिसमस २५ डिसेंबर (१ दिवस),३१ डिसेंबर – (१ दिवस)


दरम्यान ही सूट राज्य शासनाने घोषित केलेल्या शांतता क्षेत्रात लागू राहणार नाही. ध्वनीप्रदूषण नियम, २००० मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ च्या कलम १९ (अ) अन्वये आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : आदिवासी क्षेत्रातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सहा महिन्यांत करावी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; अधिसंख्य पदांवरील कर्मचाऱ्यांची माहिती दोन आठवड्यांत सादर करण्याचे

Mumbai Trees Damaged by Cables : टेलिकॉम कंपन्यांच्या केबल्सचा झाडांना विळखा

तातडीने उपाययोजना राबवून कारवाई करण्याची वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मागणी मुंबई : मुंबईत सध्या इंटरनेट,

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऐतिहासिक बिश्केक जाहीरनाम्यावर स्वाक्षरी

बिश्केक : २६ व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत मंगळवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर

BJP-MNS Clash : माहिममध्ये भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते आमनेसामने - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवण्यावरून वाद

दादरमध्ये तणाव, कार्यकर्त्यांची धरपकड मुंबई : पुण्यात शासकीय महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही