विमानात मोठ्या आवाजात गाणी ऐकणार तर......; विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केले नवे नियम

मुंबई : लांबच्या ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी आजकाल सर्रास विमानांचा वापर केला जातो. ट्रेन किंवा बसने प्रवास करताना आपल्याला खिडकीच्या बाहेर पाहता येत, अनेक लोकांमुळे मनोरंजन होत असत. पण विमानाचा प्रवास हा कंटाळवाणा असतो. त्यामुळे अनेक जण जास्त करून संगीताचा किंवा चित्रपटाचा आधार घेतात. याच गोष्टींवर विमान वाहतूक मंत्रालयाने आता एक नवीन नियम जारी केला आहे . या नव्या नियमच उल्लंघन केल्यास थेट जेलची वारीही घडू शकते.


अनेक जण आपल्या मनोरंजनासाठी मोठ्या आवाजात गाणी लावतात, त्यामुळे इतर प्रवाश्यांसाठी ते गैरसोयीचे आणि त्रासदायक होते. याच प्रवाश्यांची दखल विमान वाहतूक विभागाने घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणी असे मोठ्या आवाजात गाणी लावणे हे नियमांचे उल्लंघन असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.


केंद्रीय विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेत याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की बेशिस्त प्रवाशांना रोखण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने  ( DGCA ) जारी केलेल्या 'नागरी विमान वाहतूक आवश्यता' यानुसार ही कारवाई केली जाईल



विमान नियम १९३७ च्या अंतर्गत तरतुदी


नियम २२ : नियमानुसार, जर एखादा प्रवासी सुरक्षा किंवा शिस्तीचे उल्लंघन करत असेल, तर विमान कंपनी त्या प्रवाशाला विमानात प्रवेश नाकारू शकते किंवा विमानातून उतरवूही शकते


नियम २३ : हा नियम 'पायलट - इन - कमांड' यांना विशेष अधिकार देतो. विमानाची सुरक्षा किंवा शिस्त धोक्यात आणणाऱ्या कोणत्याही प्रवाशांविरुद्ध आवश्यक ती कारवाई करण्याचे अधिकार वैमानिकाकडे असतात.


नियम २९ : वरील नियमांचे उल्लंघन केल्यास प्रवाश्यांसाठी विशिष्ठ शिक्षेची आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे.


Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि