बाजार उठवू… आणि डॅड कोण आहे ते दाखवू!” शिवसेना प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांचा गणेश नाईक यांच्यावर जोरदार पलटवार

नवी मुंबई :  “अमेरिकेत मुलं जन्माला घालता, पण मुंबईत स्वतःच्या रक्ताला नाव द्यायला तुमची ‘फाटते’? ज्याला बापाचं कर्तव्य निभावता येत नाही, त्याने दुसऱ्याचं अस्तित्व मिटवण्याच्या वल्गना करू नयेत!” अशा अत्यंत बोचऱ्या शब्दांत शिवसेना प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी गणेश नाईकांवर निशाणा साधला. तसेच “शिंदे साहेबांचे कपडे जितके स्वच्छ, तितकंच त्यांचं राजकारण पारदर्शक आहे. जास्त बोलाल तर नवी मुंबईत येऊन तुमचा बाजार उठवला जाईल!” असा सज्जड दमही त्यांनी दिला. या वक्तव्यामुळे नवी मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर गणेश नाईक यांना उत्तर देताना वाघमारे यांनी थेट आक्रमक भूमिका घेतली. नवी मुंबईच्या राजकारणात स्वतःला ‘किंग’ समजणाऱ्यांचा मुखवटा आता उतरवण्याची वेळ आली असल्याचे सांगत त्यांनी “कुत्र्याचं शेपूट १२ महिने नळीत घातलं तरी वाकडं ते वाकडंच राहते. तीच अवस्था नाईकांची आहे,” असा टोला लगावला.


पुढे बोलताना त्यांनी नाईकांना भूतकाळाची आठवण करून दिली. "मंदा म्हात्रे यांनी तुमचा पराभव करून तुम्हाला ‘माजी’ केलं होतं, हे विसरलात का? तुमच्यासारखे छप्पन आले आणि गेले, पण शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्याची एक वीटही ढासळू शकली नाही,” असे त्या म्हणाल्या.


वाघमारे यांनी पुढे गंभीर आरोप करत “तुमचं घर वाईट आहे पण तुमचे धंदे ब्लॅक आहेत,” असा थेट हल्लाही चढवला. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा इशारा देत नाईकांना आव्हान दिले की, शिंदे यांच्या नेतृत्वावर वारंवार टीका सहन केली जाणार नाही.


शेवटी त्यांनी इंग्रजी घोषणेद्वारे हल्लाबोल अधिक तीव्र करत म्हणाल्या, “If You Are Bad, Eknath Shinde Is Your DAD!” गणेश नाईक यांनी अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर टीका केल्यानंतर त्याला दिलेले हे सर्वात आक्रमक उत्तर मानले जात आहे. नवी मुंबईत आता दोन्ही गटांतील राजकीय संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हे दिसत असून पुढील प्रतिक्रिया काय येते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन