सुधार समिती अध्यक्षपदाची माळ अमेय घोलेंच्या गळ्यात, तर बेस्ट समिती अध्यक्षपदी तृष्णा विश्वासराव?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या चार वैधानिक समित्यांपैंकी सुधार आणि बेस्ट समितीही शिवसेनेच्या वाट्याला आल्या असून सुधार समिती अध्यक्षपदी अमेय घोले आणि बेस्ट समिती अध्यक्षपदी तृष्णा विश्वासराव यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसेनेकडून अनुक्रमे अमेय घोले आणि तृष्णा विश्वासराव यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. बेस्ट समिती अध्यक्षपदी तृष्णा विश्वासराव यांची वर्णी लागल्यास बेस्टच्या पहिल्या अध्यक्ष त्या ठरल्या जाणार आहेत.


मुंबई महापालिकेच्या सुधार समिती आणि बेस्ट समिती सदस्यपदाची नावे महापौर रितू तावडे यांनी सभागृहात जाहीर केली. भाजपकडून सुधार समितीत तेजस्वी घोसाळकर, चंदन शर्मा यांना संधी दिली आहे. यापूर्वीचे भाजपचे या समिती वर सदस्य कायम ठेवले आहे. तर शिवसेनेकडून संध्या दोशी आणि अजित रावराणे यांनाही संधी देण्यात आली आहे. तर बेस्ट समितीमध्ये भाजपकडून आकाश पुरोहितसह संतोष मेढेकर, अजय सिंग,रमाकांत गुप्ता यांना संधी देण्यात आली आहे तर शिवसेनेने उपेंद्र सावंत आणि तृष्णा विश्वासराव यांची नियुुक्ती केली आहे.


सुधार समिती : 


भाजप: प्रकाश गंगाधरे,अलका केरकर, शर्मा चंदन , महादेव शिवगण, दिपक (बाळा) तावडे, स्वप्ना म्हात्रे, अनिष मकवानी, तेजस्वी घोसाळकर,साक्षी दळवी,संदिप पटेल


शिवसेना: अमेय घोले,संध्या दोशी, किरण लांडगे, अजित रावराणे,


उबाठा: विशाखा राऊत,सचिन पडवळ, रोना रावत, विठ्ठल लोकरे, जितेंद्र वळवी, मिलिंद वैद्य, उर्मिला पांचाळ


काँग्रेस: अश्रफ आझमी, राजा रहेबर खान,मेहेर हैदर


मनसे : सुप्रिया दळवी


एमआयएम : शबाना शेख


बेस्ट समिती :


भाजप: आकाश पुरोहित, सुनिल गणाचार्य, संतोष मेढेकर ,अजय सिंग ,प्रमोद वाकोडे, रमाकांत गुप्ता


शिवसेना: तृष्णा विश्वासराव, उपेंद्र सावंत


उबाठा: प्रविणा मोरजकर, सुनील अहिर, नितीन नांदगावकर, सचिन पाटील, सुनील मोरे


काँग्रेस:आशा कोपरकर, चंद्रकांत मचीगर


एमआयएम : फैसल खान

Comments
Add Comment

Chemical Leak : चेंबूरमध्ये टँकरमधून बेन्झीनची गळती; म्हैसूर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : चेंबूरच्या म्हैसूर कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या टँकरमधून बेन्झीन केमिकलची गळती झाल्याने खळबळ उडाली.

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार