२०२६ मध्ये पदवीधरांसाठी मोठी संधी; रिझर्व्ह बँकेत ६५० सहाय्यक पदांची भरती जाहीर

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू


मुंबई : बँकिंग क्षेत्रात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक ने सहाय्यक पदांच्या तब्बल ६५० रिक्त जागांसाठी अधिकृत भरती जाहीर केली आहे. देशातील विविध कार्यालयांमध्ये या जागा भरल्या जाणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.


इच्छुक उमेदवारांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावरूनच ( (www.rbi.org.in) अर्ज करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. इतर कोणत्याही माध्यमातून पाठवलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.



महत्त्वाच्या तारखा जाहीर


ऑनलाईन अर्ज कालावधी : १६ फेब्रुवारी २०२६ ते ८ मार्च २०२६
शुल्क भरण्याची अंतिम मुदत : ८ मार्च २०२६
पूर्व परीक्षा (अंदाजे) : ११ एप्रिल २०२६
मुख्य परीक्षा (अंदाजे) : ७ जून २०२६


परीक्षेच्या तारखांमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचा अधिकार बँकेकडे राखीव असल्याचे नमूद करण्यात आले आहे.



देशातील विविध शहरांत भरती


अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, लखनऊ, कोलकाता, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा आणि तिरुवनंतपुरम येथे या जागा भरल्या जाणार आहेत. गरजेनुसार पदसंख्येत वाढ किंवा घट होऊ शकते.



पात्रता आणि नागरिकत्व निकष


उमेदवार भारताचा नागरिक असावा. तसेच नेपाळ किंवा भूतानमधील नागरिक, १ जानेवारी १९६२ पूर्वी भारतात स्थायिक झालेले तिबेटी निर्वासित आणि भारतीय वंशाचे नागरिक ज्यांना भारतात कायमस्वरूपी राहण्याची परवानगी आहे, तेही पात्र ठरतील. संबंधित उमेदवारांकडे शासनमान्य प्रमाणपत्र आवश्यक राहील.



वयोमर्यादा आणि सवलती


किमान वय : २० वर्षे
कमाल वय : २८ वर्षे
(जन्म २ फेब्रुवारी १९९८ ते १ फेब्रुवारी २००६ दरम्यान असावा)



आरक्षणानुसार सवलत


अनुसूचित जाती / जमाती : ५ वर्षे
इतर मागासवर्गीय : ३ वर्षे
दिव्यांग : १० ते १५ वर्षे
माजी सैनिक : नियमांनुसार
विधवा / घटस्फोटित महिला : ३५ ते ४० वर्षांपर्यंत
बँक कर्मचारी : सेवेप्रमाणे (कमाल ३ वर्षे)



शैक्षणिक अट


कोणत्याही शाखेतील पदवी किमान ५० टक्के गुणांसह आवश्यक आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी केवळ उत्तीर्ण श्रेणी ग्राह्य धरली जाईल.


संगणकावर शब्द प्रक्रिया ज्ञान आवश्यक असून संबंधित राज्याची प्रादेशिक भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणे बंधनकारक राहील. संरक्षण सेवेत १५ वर्षे पूर्ण केलेल्या माजी सैनिकांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे.



निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत


१) पूर्व परीक्षा
२) मुख्य परीक्षा
३) भाषा प्राविण्य चाचणी


स्थानिक भाषेचे ज्ञान तपासण्यासाठी अंतिम टप्प्यात चाचणी घेतली जाईल. या चाचणीत अपात्र ठरल्यास उमेदवाराची निवड रद्द होईल.



परीक्षेचे स्वरूप


पूर्व परीक्षा


इंग्रजी : ३० प्रश्न
गणित : ३५ प्रश्न
बुद्धिमत्ता : ३५ प्रश्न
एकूण : १०० प्रश्न, १०० गुण
कालावधी : ६० मिनिटे


मुख्य परीक्षा


बुद्धिमत्ता
इंग्रजी
गणित
सामान्य ज्ञान
संगणक ज्ञान
(प्रत्येकी ४० प्रश्न, एकूण २०० प्रश्न, २०० गुण)


दोन्ही परीक्षांमध्ये चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा करण्यात येणार आहेत.



अर्ज शुल्क


सर्वसाधारण आणि इतर मागासवर्गीय : ४५० रुपये
अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग, माजी सैनिक आणि बँक कर्मचारी : ५० रुपये शुल्क केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहे.



बँकिंग क्षेत्रात स्थिर आणि प्रतिष्ठेची नोकरी शोधणाऱ्या पदवीधरांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण