पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनस्थळांची प्रचार प्रसिध्दी करावी; पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

यंदा डोंगरी महोत्सव एप्रिल मध्ये


मुंबई : राज्यातील पर्यटनस्थळांची प्रचार प्रसिध्दी होण्यासाठी पर्यटन विभागाने काटेकोरपणे प्रसिद्धीचे नियोजन करावे. राज्यात, देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्यातील पर्यटनस्थळांची प्रसिध्दी प्रभावीपणे करावी. डोंगरी महोत्सवाचे एप्रिल मध्ये आयोजन करावे, असे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.


सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटन विभागाच्या विविध विषयाच्या अनुषंगाने बैठक झाली. त्यावेळी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे,पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे उपस्थित होते.


पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, पर्यटन विभागातंर्गत विविध महोत्सवांचे आयोजन करण्यात येत आहे. आगामी कालावधीत डोंगरी महोत्सवाचे एप्रिल महिन्यात नियोजन करावे. या महोत्सवात स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम, नामांकित कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम, कृषी पर्यटन, आई पर्यटन धोरणावर केंद्रित स्थानिक महिला सशक्तीकरण कार्यक्रमांचे आयोजन, गड-किल्ले दर्शन, विविध साहसी उपक्रम, पॅराग्लायडींग, पॅरामोटरिंग, रॉक क्लायबींग, सीप्लॅन राईड हे उपक्रम आयोजित करण्यात यावेत. स्थानिक ठिकाणी पर्यटनाला चालना देण्यासाठी हे उपक्रम असतील असे पहावे असे निर्देश त्यांनी दिले.


पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, राज्यातील ७५ पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी आधुनिक मुलभूत सोयी-सुविधायुक्त नमो पर्यटन केंद्र व माहिती सुविधा केंद्र स्थापन करण्याबाबत मान्यता देण्यात आली असून पहिल्या टप्प्यातील प्रतापगड, शिवनेरी, साल्हेर व रायगड येथील कामे गतीने करावीत. राज्यात नमो पर्यटन कौशल्य कार्यक्रमासाठी ७५०० प्रशिक्षणार्थ्यांपैकी प्रथम २५०० व उर्वरित ५००० प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्याबाबतच्या कामाला गती देण्यात यावी, असे निर्देशही पर्यटनमंत्री देसाई यांनी दिले.
Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने