विरोधी पक्षनेत्यालाच उबाठाने स्थायी समितीत डावलले, स्थायी आणि शिक्षण समिती सदस्यांची नावे जाहीर

मुंबई(विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या शिक्षण आणि स्थायी समिती सदस्यांच्या नावाची अधिकृत घोषणा सोमवारी महापालिका सभागृहात करण्यात आली आहे. मात्र, महापालिकेच्या इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेत्याला स्थायी समितीमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांची स्थायी समिती सदस्यपदी नियुक्ती न करता उबाठाने आजवरच्या प्रथा परंपरेलाच छेद दिला असून एकप्रकारे उबाठाने पेडणेकर यांच्यावर या माध्यमातून अविश्वासच दाखवला आहे. दरम्यान, स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आता कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष असून भाजप पुन्हा एकदा प्रस्थापित व्यक्तीऐवजी नवीन चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता आहे.


मुंबई महापालिकेच्या शिक्षण आणि स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक येत्या २० फेब्रुवारी रोजी होणार असून यासाठी येत्या १८ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. या दोन्ही समित्यांवर सदस्यांची नावे प्रत्येक पक्षाच्या गटनेत्यांनी महापौरांना बंद लिफाफ्यात सादर केली. त्यानुसार या लिफाफ्यातील नावे महापौरांनी जाहीर करून त्यांची स्थायी आणि शिक्षण समितीवर नियुक्ती झाल्याचे जाहीर केले.


स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शिंदे, नार्वेकर, भांदिर्गे यांच्यात स्पर्धा


स्थायी समितीवरील सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली असून भाजपने शितल गंभीर, प्रकाश दरेकर, प्रिती सातम, तेजिंदर तिवाना आदींना संधी दिली आहे. त्यामुळे भाजपच्यावतीने प्रभाकर शिंदे, ऍड मकरंद नार्वेकर आणि हरिष भांदिर्गे यांच्यात स्पर्धा आहे.


महापालिकेच्या इतिहासात प्रथमच असे घडले


विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांना उबाठाने स्थायी समिती सदस्यपदी डावलले आहे. महापालिकेत नियम नसला तरी आजवरच्या प्रथा आणि परंपरेनुसार विरोधी पक्षनेत्याला स्थायी समितीत स्थान दिले जाते. परंतु प्रथमच विरोधी पक्षनेत्याला स्थायी समितीमध्ये डावलले गेले आहे. महापौरपदाच्या कालावधीमध्ये ज्याप्रकारे पेडणेकर यांनी केलेला कारभार आणि भाजपकडून होत असलेले आरोप पाहता उबाठाने पेडणेकर यांना या महत्वाच्या समितीतून बाहेर केले असल्याचे बोलले जात आहे. आजवरच्या महापालिकेच्या इतिहासात प्रथमच घडत असले तरी मी स्वत: हे पद न घेवून या समिती सदस्यपदी पक्षाच्या एका सदस्याची वर्णी लावली असल्याचे किशोरी पेडणकर यांनी स्पष्ट केले.


स्थायी समिती:


भाजप: गणेश खणकर, प्रभाकर शिंदे,राखी जाधव, अॅड. मकरंद नार्वेकर, हरिष भांदिर्गे, शिवकुमार झा, शितल गंभीर, प्रकाश दरेकर, प्रिती सातम, तिवाना ताजिंदरसिंग


शिवसेना: अमेय घोले,यामिनी जाधव, अंजली नाईक,डॉ सईदा खान


उबाठा : श्रध्दा जाधव, यशोधर फणसे, दिपमाला बढे, लक्ष्मी भाटीया, रमाकांत रहाटे, टी जगदीश, मिनाक्षी पाटणकर


काँग्रेस: अश्रफ आझमी, तुलीप मिरांडा, अजंता यादव


एमआयएम: कुरेशी जमिरी


मनसे : यशवंत किल्लेदार


शिक्षण समिती:


भाजप: राजेश्री शिरवडकर, स्वप्ना म्हात्रे, सुषम सावंत, शिवानंद (शिवा) शेट्टी,योगिता कोळी, डॉ. नील किरीट सोमैया , रोहन राठोड, पिल्ले श्रीकला , राजपूत विक्रम , बिगर मनपा सदस्य: निखिल व्यास, योजना ठोकळे


शिवसेना:अंजली नाईक, वर्षा टेंबवलकर,धनश्री भरडकर, बिगर मनपा सदस्य चंद्रावती मोरे


उबाठा: अंकित प्रभू, गीता भंडारी,पुजा महाडेश्वर, चित्रा सांगळे, सोनाली साबे, प्रमोद सावंत, सोनाली साबे


काँग्रेस: कॅरेन डिमेलो, कमरजहाँ सिद्दीकी, बिगर मनपा सदस्य प्रियंका राऊत,


एमआयएम : मेहजाबीन अतिक अहमद


मनसे : ज्योती राजभोज

Comments
Add Comment

Chemical Leak : चेंबूरमध्ये टँकरमधून बेन्झीनची गळती; म्हैसूर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : चेंबूरच्या म्हैसूर कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या टँकरमधून बेन्झीन केमिकलची गळती झाल्याने खळबळ उडाली.

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार