Emmanuel Macron India Visit: पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यात द्विपक्षीय चर्चेला सुरुवात

मुंबई: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सोमवारी रात्री तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर प्रथम महिला ब्रिजिट मॅक्रॉन यांच्यासह मुंबईत दाखल झाले आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई विमानतळावर फ्रान्सचे अध्यक्ष आणि प्रथम महिला यांचे स्वागत केले.


त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांच्यातील भेटीचे फोटोही समोर आले आहेत. दोन्ही नेते एकमेकांना हात मिळवताना आणि फोटोशूटसाठी पोझ देताना दिसत आहेत. आज संध्याकाळी, दोन्ही नेते भारत-फ्रान्स इनोव्हेशन इयर २०२६ चे उद्घाटन करतील. यावेळी मोदी आणि मॅक्रॉन उद्योगपती, स्टार्टअप संस्थापक, संशोधन तज्ञ आणि नवोन्मेषी नेत्यांना संबोधित करतील. मॅक्रॉन दिल्ली येथे होणाऱ्या एआय इम्पॅक्ट समिटमध्ये देखील सहभागी होतील.



अध्यक्ष मॅक्रॉन यांच्याकडून २६/११ हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली :


पंतप्रधान मोदींची भेट घेण्याआधी अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मुंबईतील ताजमहाल पॅलेसमध्ये २६/११ हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली वाहिली. तर दुसरीकडे, पंतप्रधान मोदींनी एक्स वरून अध्यक्ष मॅक्रॉन यांचे स्वागत केले आणि लिहिले, "भारत तुमच्या भेटीसाठी आणि भारत - फ्रान्स यांच्यातील परस्पर संबंध नवीन उंचीवर नेण्यास मी उत्सुक आहे. मला विश्वास आहे की आपल्या चर्चेमुळे सर्व क्षेत्रांमध्ये सहकार्य आणखी मजबूत होईल आणि जागतिक प्रगतीला हातभार लागेल."





फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा हा चौथा भारत दौरा आहे. यापूर्वी ते २०१८, २०२३ आणि २०२४ मध्ये भारत दौऱ्यावर आले होते.


भारत आणि फ्रान्समध्ये १९९८ पासून धोरणात्मक भागीदारी आहे आणि दोन्ही देश संरक्षण, तंत्रज्ञान, अवकाश आणि ऊर्जा यासारख्या क्षेत्रात एकत्र काम करत आहेत. या सहकार्याला आणखी बळकटी देण्यासाठीही ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या (पीएमओ) मते, पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांच्यातील चर्चेत भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी अंतर्गत झालेल्या प्रगतीचा व्यापक आढावा घेतला जाईल.

Comments
Add Comment

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक