Water Metro: मुंबईच्या समुद्रात ८ मार्गांवर धावणार 'वॉटर मेट्रो' - मंत्री नितेश राणे यांची महत्त्वपूर्ण घोषणा

डिसेंबर २०२६ पर्यंत दोन मार्गिका सुरू होणार


मुंबई : मुंबईतील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरचा ताण कमी करण्यासाठी आता मेट्रोप्रमाणे जलवाहतुकीवर भर दिला जाणार आहे. कोचीच्या धर्तीवर मुंबईसह महानगरात 'वॉटर मेट्रो' सुरू करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात डिसेंबर २०२६ पर्यंत दोन मार्गिका प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील, अशी घोषणा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत केली.


यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, "ज्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत मेट्रोचे जाळे यशस्वीपणे उभारले, त्याचप्रमाणे जलवाहतुकीचे जाळे निर्माण करणे हा आमचा 'ड्रीम प्रोजेक्ट' आहे. मागील दीड वर्षांपासून आम्ही या प्रकल्पावर काम करीत आहोत. मुंबई महानगरात एकूण ७ ते ८ मार्ग निश्चित करण्यात आले असून, प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) अंतिम टप्प्यात आहे. या महिनाअखेरीस हा अहवाल प्राप्त झाल्यावर तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाईल."


मुंबईत जशी मेट्रो, लोकल, रिक्षा, टॅक्सी अशी प्रवासाची साधने आहेत, त्याप्रकारे आम्ही 'मुंबई वॉटर मेट्रो' ही सुविधा मुंबईकरांच्या सेवेत आणत आहोत. त्यासाठी एकात्मिक तिकीट प्रणाली देखील असेल. यापैकी दोन मार्गिक डिसेंबर २०२६ पर्यंत सुरू करण्याचा मानस असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले. मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी आणि सुखकर प्रवासासाठी 'मुंबई वॉटर मेट्रो' हा मैलाचा दगड ठरेल, असा विश्वासही नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला.



'कँडेला' कंपनीसोबत लवकरच करार:


पत्रकार परिषदेपूर्वी मंत्री नितेश राणे यांनी वॉटर मेट्रोसाठी स्वीडनमधील जगप्रसिद्ध 'कँडेला' कंपनीसोबत मंत्रालयात महत्त्वाची बैठक घेतली. या प्रकल्पात 'हायड्रोफॉईल' या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. विदेशी गुंतवणुकीच्या माध्यमातून या बोटी तयार करण्यासंदर्भात कंपनीचे संस्थापक आणि सीईओ गुस्ताव हॅसेल्सकोग यांच्यासह सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला नकुल विराट, अंशुल दवानी, अंबर आयदे आदी मान्यवर उपस्थित होते.



प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये:


१) एकात्मिक तिकीट प्रणाली : मेट्रो, लोकल बेस्टप्रमाणेच वॉटर मेट्रोसाठीही एकात्मिक तिकीट प्रणाली असेल.
२) प्रदूषणमुक्त प्रवास : अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ही वाहतूक पर्यावरणपूरक आणि वेगवान असेल.
३) पहिला टप्पा : एमएमआर क्षेत्रात डिसेंबर २०२६ पर्यंत दोन मार्ग सुरू करण्याचे नियोजन.
४) कनेक्टिव्हिटी : मुंबईतील विविध किनारपट्ट्यांना जोडण्यावर विशेष भर.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा उद्या निकाल

- आदित्य ठाकरे प्रतिवादी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई : दिशा सालियन