Nitesh Rane : काजू उद्योगासाठी वाढीव परतावा योजनेबाबत शासन सकारात्मक; मंत्री नितेश राणे

केंद्र-राज्य शासनाच्या समन्वयातून महाराष्ट्रातून काजू निर्यात वाढविण्याची मंत्री नितेश राणे यांची ग्वाही


मुंबई : काजू प्रक्रिया उद्योगासाठी लागू असलेल्या ५ टक्के परतावा योजनेअंतर्गत वाढीव निधी उपलब्ध करून देण्याबाबत आज मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. काजू उद्योगाला आर्थिक बळकटी देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या दृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.


या बैठकीत काजू निर्यात धोरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. केंद्र व राज्य शासन यांच्यात समन्वय साधून महाराष्ट्रातून काजूची निर्यात वाढविण्याबाबत धोरणात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश मंत्री श्री. नितेश राणे यांनी यावेळी दिले. काजू प्रक्रिया उद्योग, निर्यातदार व शेतकरी यांना अधिक लाभ मिळावा यासाठी आवश्यक त्या निर्णयांवर सकारात्मक भूमिका घेण्यात आली.



या बैठकीस महाराष्ट्र काजू प्रक्रिया उद्योग (KCO) असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सुरेश बोवलेकर यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या निर्णयामुळे सिंधुदुर्गसह कोकणातील काजू उद्योगाला चालना मिळून रोजगारनिर्मिती, निर्यातवाढ तसेच स्थानिक आर्थिक विकासाला बळकटी मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Comments
Add Comment

Western Railway New Timetable : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक लागू; जाणून घ्या नवीन बदल

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग असलेल्या पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवांमध्ये १ सप्टेंबर

Kalwa Hospital News : कळवा रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ? संतापाची लाट; कंत्राटदारावर कारवाईची मागणी

ठाणे : ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाला देण्यात आलेल्या जेवणात झुरळ आढळल्याचा

Chemical Leak : चेंबूरमध्ये टँकरमधून बेन्झीनची गळती; म्हैसूर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : चेंबूरच्या म्हैसूर कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या टँकरमधून बेन्झीन केमिकलची गळती झाल्याने खळबळ उडाली.

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन