गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातील कंत्राटदाला ५० लाखांचा दंड

दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्‍यान उड्डाणपूलाच्या कामांत दिरंगाई


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे बांधकाम अपेक्षित गतीने सुरू न ठेवल्‍याप्रकरणी संबंधितकंत्राटदारास ५० लाख रूपयांच्या दंडाची आकारणी करावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. दरम्यान,या उड्डाणपुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या उद्देशाने आवश्यक तेवढे मनुष्यबळ व इतर यंत्रणा यांची कुमक वाढवावी. ३१ मे २०२६ पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीस खुला करावा, असे निर्देशही बांगर यांनी दिले आहेत.


गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग (जीएमएलआर) प्रकल्प एकूण चार टप्प्यांमध्ये प्रस्तावित आहे. टप्पा ३ (अ) मध्ये उड्डाणपूल, एलिव्हेटेड रोटरी बांधकामाचा समावेश आहे. या प्रकल्प अंतर्गत दिंडोशी - गोरेगाव - दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्‍यान १.२६ किलोमीटर लांबीच्‍या उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. या उड्डाणपुलाच्‍या कामाची अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी बुधवारी १८ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रत्‍यक्ष पाहणी केली. तसेच, विविध निर्देश दिले. उप आयुक्‍त (पायाभूत सुविधा) गिरीश निकम, कार्यकारी अभियंता (पूल) नरेश मेघराजानी यांच्‍यासह महानगरपालिका अभियंते, सल्‍लागार यावेळी उपस्थित होते.


दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे. दिंडोशी न्‍यायालयापासून उड्डाणपुलास सुरुवात होते. रत्‍नागिरी जंक्‍शन हॉटेल येथे ९० अंश कोनात उड्डाणपूल वळतो. तर, दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे उतरतो. पुलाचे एकूण ३१ खांब असून, ३१ खांबांची उभारणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. तसेच, एकूण ३० पैकी २० स्पॅनचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित १० स्पॅनचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्‍याचे नियोजन आहे. एकूण ७५ टक्‍के काम पूर्ण झाले आहे. खांबांवर तुळई स्‍थापित करणे, डेक स्‍लॅब ओतकाम, पोहोच मार्ग आदी कामांसाठी वेळापत्रक निश्चित करण्‍यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याच्या उद्देशाने आवश्यक तेवढे मनुष्यबळ व इतर यंत्रणा यांची अधिक कुमक उपलब्‍ध करून देण्‍याबाबत संबंधितांना निर्देश वेळोवेळी देण्‍यात आले आहेत. ३१ मे २०२६ पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्‍याचे महानगरपालिकेचे उद्दिष्‍ट आहे. तथापि, कंत्राटदाराने ठरविलेल्या वेळापत्रकाचे पालन न केल्याचे प्रत्यक्ष पाहणी दरम्यान स्पष्ट झाले. उड्डाणपुलाचे बांधकाम संथ गतीने सुरू राहिल्‍याप्रकरणी कंत्राटदाराकडून ५० लाख रुपयांचा दंड आकारावा, असे निर्देश बांगर यांनी दिले आहेत. दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे उड्डाणपूल उतरतो, त्‍या ठिकाणी पोहोच रस्‍ता केला जाणार आहे. मात्र, या मार्गात जलवाहिन्‍या, सांडपाणी नाला आणि अदाणी पॉवर यांचे विद्युत परिवर्तक (ट्रान्सफॉर्मर) अडथळा ठरत आहे. त्‍यांचे तातडीने स्‍थलांतरण / नव्‍याने बांधणी करावी, असेदेखील निर्देश बांगर यांनी दिले आहेत.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने