Bhigwan Case: 'मुलीला सुखरूप सोडवा, पोलीस अधीक्षकांची हत्तीवरून मिरवणूक काढतो'

पुणे: पुण्यातील भिगवण परिसरात मुलीचं अपहरण प्रकरण चांगलंच तापलं आहे. त्यातच आता माझे माझ्या प्रियकरावर प्रचंड प्रेम असून त्याने माझ्यावर अजिबात जबरदस्ती केली नाही, माझ्या मर्जीनेच मी घराबाहेर पडल्याचे तरुणीने स्पष्ट केले. परंतु तसे सांगण्यासाठी तिच्यावर दबाव असल्याचे भाजप नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. त्यांनी पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त केली. पुण्याच्या पोलीस अधीक्षकांनी मुलीला सुखरूपपणे कुटुंबियांकडे आणून सोडावी, मी त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढतो, असे पडळकर म्हणाले.


भिगवण येथून मंगळवारी दुपारी तीन वाजता मुलीचे अपहरण झाल्याचे सांगण्यात आले. मुलगी खरेदीहून येत असताना आरोपीने मुलीच्या घरच्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून मुलीचे अपहरण केल्याचा आरोप आहे. मात्र कथित अपहरणाच्या २४ तासांनंतर माझे अपहरण झालेले नसून आमचे प्रेमप्रकरण असल्याचे मुलीने व्हिडीओद्वारे सांगितले आहे. हे अपहरण प्रकरण राज्यभरात चर्चेचा विषय ठरल्यानंतर पडळकर भिगवणला आले. तिथे हजारोंचा जमाव जमला होता. पडळकर यांच्या नेतृत्वात हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजनही केले गेले होते. परंतु पोलिसांनी मज्जाव केल्याने मोर्चा होऊ शकला नाही.



'...त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढतो'



त्यानंतर पडळकर यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. पडळकर म्हणाले, अपहरणाच्या गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात यावे. याआधी अजहर शेखने तलाठ्याला मारहाण केली मात्र पोलिसांनी अटक केली नाही. त्याच्यावर अनेक प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. खरे तर त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करून त्याला बेड्या ठोकाव्यात. आमची मुलगी तिच्या आईच्या ताब्यात आणून द्यावी. MPSC पास झालेल्या मुलासोबत मुलीचे लग्न ठरले होते. पोलीस अधीक्षकांनी मुलीची सुखरूपपणे सुटका करावी, आम्ही त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढतो.



मुलीची टिकली गायब



पोलिसांकडून आम्हाला त्वरित निकाल पाहिजे. व्हिडिओमध्ये मुलीची टिकली गायब केली आहे. हा मताचा विषय नाही तर हा आमच्या अस्तित्वाचा विषय आहे. भारतासारखा सुरक्षित देश जगात कुठे नाही. भारत हरल्यावर जे फटाके उडवतात, त्यांना जागा दाखवायची वेळ आली असल्याचे पडळकर म्हणाले.



काय म्हणाली संबंधित मुलगी?



भिगवण येथील मुलीच्या अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट आला असून संबंधित मुलीने आपण स्वमर्जीने घराबाहेर पडल्याचे सांगितले आहे. माझ्यावर कुणाचीही जबरदस्ती नाही, माझे त्या मुलावर प्रेम आहे, असा कबुलीजबाब मुलीने दिला आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण