स्थायी समिती आणि शिक्षण समिती अध्यक्षपदावर मुलुंडचा वरचष्मा; प्रभाकर शिंदे स्थायी समिती तर राजेश्री शिरवडकर शिक्षण समिती अध्यक्षपदाचे उमेदवार

मुंबई: मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपच्यावतीने ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे आणि शिक्षण समिती अध्यक्षपदी राजेश्री शिरवडकर यांचे नाव जाहिर करण्यात आले असून या दोघांनी आपले उमेदवारी अर्ज महापालिका सचिवांना सादर करण्यात आला आहे. तर सुधार समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्यावतीने संध्या दोशी सक्रे यांनी आपला अर्ज महापालिका सचिवांना सादर केला. विशेष म्हणजे या तिन्ही समित्यांच्या अध्यक्षपदासाठी उबाठाच्यावतीने एकाही सदस्याने उमेदवारी अर्ज सादर न केल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. दरम्यान, स्थायी समिती अध्यक्षपदाचे उमेदवार प्रभाकर शिंदे हे मुलुंडमधील असून शिक्षण समिती अध्यक्षपदाचे उमेदवार राजेश्री शिरवडकर यांचे माहेर मुलुंडमधील असल्याने या दोन्ही समित्यांवर मुलुंडचा वरचष्मा असल्याचे दिसून आले आहे.


मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपच्यावतीने प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर आणि हरिष भांदिर्गे यांच्या नावाची चर्चा असताना भाजपने अखेर ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्या नावाची घोषणा करत महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या या अनुभवी नगरसेवकांच्या हाती सोपवल्या आहेत. त्यामुळे भाजपच्यावतीने प्रभाकर शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज महापालिका सचिवांना सादर केला. प्रभाकर शिंदे हे महापालिकेत अनेक वर्षे सभागृहनेते होते, स्थायी समितीवर अनेक वर्षे ते सदस्य होते. तसेच भाजपचे मागील पाच वर्षांत ते गटनेते होते. मुलुंडमधील प्रभाग क्रमांक १०६मधून निवडून आलेले प्रभाकर शिंदे यांचे वक्तृत्व आणि प्रशासनावरील पकड मजबूत असल्यामुळे भाजपकडे शिंदे यांच्या व्यतिरिक्त अन्य कुणी पर्याय नव्हता. त्यामुळे प्रभाकर शिंदे यांची स्थायी समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.



शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी राजेश्री शिरवडकर


 

मुंबई महापालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी भाजपच्यावतीने ज्येष्ठ नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. शीव माटुंगा येथील प्रभाग क्रमांक १७२मधून निवडून आलेल्या राजेश्री शिरवडकर या मागील अनेक वर्षांपासून सुधार आणि स्थायी समिती सदस्य होत्या.तसेच महिला व बाल कल्याण समितीच्या त्या अध्यक्षही राहिल्या होत्या. महापौर पदासाठी राजेश्री शिरवडकर यांचे नाव अग्रक्रमावर होते. परंतु त्यांची महापौरपदी वर्णी न लागल्याने शिक्षण समिती अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली आहे. शिक्षण समिती अध्यक्ष हे स्थायी समितीत पदसिध्द सदस्य असल्याने त्या स्थायी समितीतही त्यांना स्थान असणार आहे.



सुधार समिती अध्यक्षपदासाठी संध्या दोशी सक्रे यांचे नाव जाहीर



महापालिकेची सुधार समिती ही शिवसेनेच्या वाट्याला आली असून या समितीच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्यावतीने संध्या दोशी सक्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संध्या दोशी यांनी आपला उमेदवारी अर्ज महापालिका सचिवांना सादर केला.


स्थायी समिती, शिक्षण समिती आणि सुधार समिती अध्यक्षपदाचे उमेदवारी अर्ज भरताना सभागृहनेते गणेश खणकर, शिवसेना गटनेते अमेय घोले यांच्यासह सर्व समित्यांचे सदस्य उपस्थित होते. यासर्वांच्या उपस्थितीत महापालिका सचिव मंजिरी देशपांडे यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.




तृष्णा विश्वासराव ठरणार बेस्ट समितीच्या पहिल्या महिला अध्यक्षा



मुंबई महापालिकेशी संलग्न असलेल्या बेस्ट समितीच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्यावतीने ज्येष्ठ नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. तृष्णा विश्वासराव यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी चक्क बेस्ट बसमधून प्रवास करत बेस्ट भवन गाठले.तृष्णा विश्वासराव यांनी आपला अर्ज बेस्ट सचिव सुशील पवार यांना सादर केला. आतापर्यंत बेस्ट समितीवर पुरुषांचे वर्चस्व अध्यक्षांच्या रुपात पहायला मिळाले होते. परंतु यावेळी प्रथमच महिला अध्यक्ष होत असून पहिल्या बेस्ट समिती अध्यक्ष होण्याचा मान तृष्णा विश्वासराव यांच्या पदरात पडणार आहे.



उबाठाकडून पुन्हा उमेदवार नाहीच



महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत उमेदवार न देणाऱ्या उबाठा पक्षाकडून स्थायी समिती, शिक्षण समिती, सुधार समिती आणि बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी उमेदवार देण्यात आले नाही. संध्याकाळी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपुष्टात येईपर्यंत उबाठाने आपले उमेदवार दिले नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असून स्थायी आण शिक्षण समिती अध्यक्षपदाची २० फेब्रुवारी रोजी तर सुधार आणि बेस्ट समिती अध्यक्षपदाची निवडणूक २३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यामुळे ही निवडणुकीची औपचारिकता पार पाडून चारही अध्यक्षांची निवड झाल्याचे पिठासीन अधिकारी घोषित करणार आहे.

Comments
Add Comment

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक