मुंबई क्लायमेट वीक इनोव्हेशन चॅलेंज २०२६: आठ हवामान स्नेही नवोपक्रम विजेते घोषित

राज्यपाल आचार्य देवव्रत, मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते वितरण


मुंबई : हवामान बदलावरील उपायांना चालना देण्यासाठी मुंबई क्लायमेट वीकच्या समारोपाच्या दिवशी 'MCW इनोव्हेशन चॅलेंज २०२६' च्या विजेत्यांची घोषणा केली. यामध्ये भारत आणि ग्लोबल साउथ (विकसनशील देश) मधील आठ उच्च-प्रभावी हवामान नवोन्मेषकांचा सन्मान करण्यात आला, ज्यामध्ये तरुणांनी विकसित केलेल्या दोन उपायांचाही समावेश आहे.


हे पुरस्कार समारोपाच्या सत्रात महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा गोपीनाथराव मुंडे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


यावर्षी ३५० हून अधिक स्टार्टअप्स आणि तरुण बदल घडवू पाहणाऱ्यांनी जलसंधारण, ऊर्जा कार्यक्षमता, मोबिलिटी, शाश्वत साहित्य आणि कार्बन अकाउंटिंग यांसारख्या क्षेत्रांत पुरस्कारासाठी अर्ज केले होते. अर्जांच्या छाननीनंतर, ३४ अंतिम स्पर्धकांनी (finalists) शेवटच्या फेरीत प्रवेश केला.



MCW इनोव्हेशन चॅलेंज २०२६ चे विजेते


निवडण्यात आलेले आठ विजेते हे भारतातील हवामान बदलाचा वेग कमी करण्यासाठी आणि लवचिकता मजबूत करण्यासाठी अत्यंत सक्षम आणि गुंतवणुकीसाठी तयार असलेले उपाय सुचविले आहेत.


प्रमुख विजेते:
* एनलॉग (Enlog)
* Temperate Technologies Private Limited
* Fitsol Supply Chain Solutions
* Indra Water
* Bambrew
* Torus Robotics


युथ ग्रीन इनोव्हेशन चॅलेंज विजेते (१६ ते २४ वयोगटातील तरुण):
* EnviroWealth
* Decentralized Biochar Systems



सहकार्य आणि भागीदारी


हा उपक्रम नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (NSE) यांच्या सहकार्याने 'इनोव्हेशन चॅलेंज पार्टनर' म्हणून आणि सोशल अल्फा यांच्या सहकार्याने 'सपोर्ट पार्टनर' म्हणून आयोजित करण्यात आला होता. क्लायमेट कलेक्टिव्ह फाउंडेशन हे 'क्लायमेट रि-डिझाइन चॅलेंज पार्टनर' म्हणून सहभागी झाले होते. तरुणांसाठीचे विशेष 'युथ ग्रीन इनोव्हेशन चॅलेंज' हे युवाह (युनिसेफ) च्या भागीदारीत राबवण्यात आले. ज्यामध्ये अन्न प्रणाली, शहरी लवचिकता आणि ऊर्जा संक्रमण या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. या चॅलेंजमुळे केवळ विजेते निवडले गेले नाहीत, तर त्यांना क्षमता बांधणी, मार्गदर्शन आणि गुंतवणूकदारांशी संपर्क साधण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Chemical Leak : चेंबूरमध्ये टँकरमधून बेन्झीनची गळती; म्हैसूर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : चेंबूरच्या म्हैसूर कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या टँकरमधून बेन्झीन केमिकलची गळती झाल्याने खळबळ उडाली.

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार