शिवजयंती उत्सव निमित्त मुंबईत विविध ठिकाणी कार्यक्रम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त, मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित 'शिवजयंती उत्सव' अंतर्गत, दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.


अभिवादन कार्यक्रमानंतर दादर येथील क्रीडा भवन येथे महानगरपालिकेच्या संगीत कला अकादमीच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडे आणि शिवगीतांचे सादरीकरण करण्यात आले.


माननीय राज्यपाल यांच्याकडून कौतुक : संगीत कला अकादमीच्या वतीने सादर करण्यात आलेल्या शिवगीतांना राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मनमुराद दाद देत कलाकारांचे कौतुक केले. तसेच ५१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.


मुंबईच्या महापौर रितू तावडे, खासदार अनिल देसाई, आमदार सुनील शिंदे, महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, नगरसेविका तृष्णा विश्वासराव, उप आयुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे, उप आयुक्त (विशेष) (अतिरिक्त कार्यभार) विनायक विसपुते आणि महानगरपालिका सचिव मंजिरी देशपांडे यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.


भारताचे प्रवेशद्वार (गेट वे ऑफ इंडिया) येथेही अभिवादनः भारताचे प्रवेशद्वार (गेट वे ऑफ इंडिया) येथे सकाळी श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीतर्फे आयोजित समारंभास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी "ए" विभागाचे सहाय्यक आयुक्त जयदीप मोरे, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष किसन जाधव, सरचिटणीस संजय शेटये हे मान्यवर उपस्थित होते. शिवजयंती उत्सवानिमित्त सकाळी ७ ते ९ या वेळेत चौघडा व सनई वादनाने वातावरण प्रफुल्लित झाले. त्यानंतर श्री. शिव छत्रपती मंडळाच्या सुहासिनींनी श्री शिवरायांची आरती सादर केली.


राणीबागेतील बाल शिवाजीच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण : वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील बाल शिवाजीच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .याप्रसंगी स्थानिक नगरसेवक रमाकांत रहाटे, प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी उपस्थित होते.


महापालिका मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी : मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील महानगरपालिका सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्यास मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी "ए" विभागाचे सहाय्यक आयुक्त जयदीप मोरे, महानगरपालिका उप सचिव सुशिल महाजन उपस्थित होते .

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर