Raj Thackeray Meet Eknath Shinde : माझा पक्ष पळवला, माझा बाप पळवला अन् आता भाऊही...; शिंदे गटाच्या शीतल म्हात्रेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या भेटीगाठींचे सत्र जोरात असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या 'नंदनवन' या निवासस्थानी भेट घेतली. या दोन दिग्गज नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असतानाच, शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी यावरून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. म्हात्रे यांनी या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत उद्धव ठाकरेंच्या सद्यस्थितीवर उपरोधिक टिप्पणी केली आहे. "माझा पक्ष पळवला... माझा बाप पळवला... आता माझा भाऊ पळवला!!!" अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंना डिवचले आहे. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाढत्या जवळीकीमुळे विरोधकांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली असून, आगामी काळात नव्या राजकीय समीकरणांची नांदी या भेटीतून पाहायला मिळू शकते, असे बोलले जात आहे.






...दोन वाघ एकत्र येत असतील तर आनंदच!!- नरेश म्हस्के




अशातच, या भेटीवर भाष्य करताना शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून काहींना पोटशूळ उठला असल्याची बोचरी टीका त्यांनी केली आहे. म्हस्के यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे दोन्ही नेते वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीतून घडलेले कार्यकर्ते आहेत. जर हे दोन नेते हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी एकत्र येत असतील, तर ही सामान्य शिवसैनिकांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. या विधानामुळे आता महायुती आणि मनसे यांच्यातील जवळीक अधिक स्पष्ट होत असल्याचे दिसून येत असून, आगामी काळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नवी युती आकारास येण्याचे संकेत मिळत आहेत.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने