एलबीएस मार्ग आणि शीव-कुर्ला रेल्वे मार्गावरील पूरपरिस्थितीला आता ब्रेक

मुंबई: भरतीच्या वेळी तसेच विहार आणि पवई तलावामधील ओसंडून वाहणाऱ्या पाण्यामुळे लाल बहादूर शास्त्री मार्ग तसेच शीव आणि कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर दरवर्षी पाणी भरते. परंतु येत्या दोन वर्षांमध्ये ही समस्या आता कायमचीच दूर होणार असून या पावसाळी पाण्यामुळे विस्कळीत होणारी रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूकीच्या समस्येतूनच कायमचाच दिलासा मिळणार आहे. कारण या समस्येचे निवारण करण्यासाठी आता महापालिकेच्यावतीने मिठीनदी विकास प्रकल्पांतर्गत सीएसटी पूल ते माहिम कॉजवे व वाकोला नदी सहीत भरती प्रवण क्षेत्रात पंपिंग स्टेशन तसेच इतर कामे हाती घेऊन याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.


मुंबई महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या मिठी नदी प्रकल्पाचे काम दोन टप्प्यात करण्यात आले असून त्यातील टप्पा एक अंतर्गत मिठी नदीचे १६ ते ६० मीटरपर्यंत रुंदीकरण व गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर टप्पा दोन अंतर्गत चितळे समिती, केंद्रीय जल विद्युत अनुसंधान संस्था आणि आय टआ टी मुंबई यांनी सादर केलेल्या अहवाल तथा शिफारशीनुसार मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरण यांनी मिठी नदी विकास प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार टप्पा दोनअंतर्गत अतिरिक्त रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षक भिंत व सेवा रस्ता बांधणे ही कामे अंतर्भूत करण्यात आली आहे. त्यानुसार टप्पा दोन अंतर्गत मिठी नदीचे २० ते १०० मीटरपर्यंत रुंदी करण्याचे काम करण्यात आले आहे.


त्यात आता मिठी नदीच्या टप्पा तीन हे काम भरती प्रवण क्षेत्रामध्ये असल्यामुळे मिठी नदीमध्ये विसर्गित होणाऱ्या पाण्याला इंन्टसेप्टरद्वारे अडवून ते पूर नियंत्रणासोबतच प्रदुषण नियंत्रणाशी संबंधित आहे. मिठी नदीमध्ये विसर्गित होणारी पातमुखे ही उच्च पूर पातळीच्या खाली आहेत. त्यामुळे हा विसर्ग इंटरसेप्टरद्वारे अडवून तो नजिकच्या मलजल प्रक्रिया प्रकल्पाला जोडण्यात यावा अशाप्रकारची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे मिठी नदी विकास व प्रदुषण् नियंत्रण प्रकल्प अंतर्गत सीएसटी पूल ते माहिम कॉजवे व वाकोला नदी सहित भरती प्रवणक्षेत्रात पंपिंग स्टेशनसहित पूर नियंत्रण दरवाजे बांधणे, बिनपावसाळी प्रवाह इंटरसेप्टर बांधून वळवणे, मलजल वाहिन्या टाकणे आदींची कामे हाती घेण्यासाठी निविदा मागवली


या अंतर्गत मिठी नदी व वाकोला नदीत एकूण २५ पातमुखांद्वारे होणारे सांडपाणी अडवून ते मिठी नदीच्या किनाऱ्यालगत नियोजित ८३४३ मीटर लांब एवढ्या मलवाहिन्यांद्वारे मुख्य मलवाहिनी वळवणे तसेच मिठी नदीचे उर्वरीत ३००मीटर लांबीचे रुंदीकरण व खोलीकरण, ४७२० मीटर लांबीची संरखक भिंत, ६४२१ लांबीचे सेवा रस्ते व १८ पातमुखांवर पंपिंग स्टेशनची कामे करण्यात येत आहे. यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये अदानी अशोका अक्षया ही संयुक्त भागीदारीतील कंपनी पात्र ठरली असून या कंपनीला विविध करांसह २७५० कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म