ती पुन्हा येतेय! मुंबईत नवीन अद्ययावत मोनोरेल लवकरच पुन्हा धावणार...

मुंबई : आधुनिकीकरण करण्यासाठी मुंबईतली मोनोरेलची सेवा सप्टेंबर २०२५ मध्ये बंद करण्यात आली. ही सेवा मे २०२६ किंवा त्याआधी नव्याने सुरू करण्याची घोषणा त्याचवेळी करण्यात आली होती. आता एमएमआरडीएने सोशल मिडिया पोस्ट करून मोनोरेल लवकरच सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे. मोनोरेलचे आधुनिकीकरण झाले आहे. तसेच मोनोरेलने आपल्या नवीन रोलिंग स्टॉक आणि CBTC-आधारित सिग्नलिंग प्रणालीसाठी आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकनकर्ता ही भूमिका पार पाडणाऱ्या 'ब्युरो व्हेरिटास' या जागतिक स्तरावरील चाचणी आणि तपासणी प्रमाणीकरण क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेने मोनोरेलला सुरक्षा प्रमाणपत्र दिले आहे. हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा असून, सुधारित मोनोरेल सार्वजनिक सेवेसाठी सुरू करण्याच्या दिशेने आपण आणखी एक पाऊल पुढे पडले आहे.





आता पुढील टप्प्यात संपूर्ण १९.५४ किमी मोनोरेल कॉरिडॉरच्या सर्वसमावेशक तपासणीसाठी आणि प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी अंतिम वैधानिक मंजुरी मिळावी, याकरिता सेवानिवृत्त मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची नियुक्ती केली जाईल. ही प्रक्रिया देखील लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा असून, त्यानंतर नवीन आणि सुधारित अद्ययावत मोनोरेल पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल.



ISA प्रमाणपत्र खालील महत्त्वाच्या टप्प्यांची यशस्वी पूर्तता झाल्यानंतर प्रदान करण्यात आले:


उत्पादन सुविधेत नवीन रोलिंग स्टॉकची सविस्तर तपासणी
परिचालन सज्जतेचे मूल्यांकन करण्यासाठी मोनोरेल कॉरिडॉरच्या विविध भागांवर दोन महिने कठोर चाचण्या
डिझाइन तपशील आणि सर्वोच्च सुरक्षा मानकांचे पूर्ण पालन सुनिश्चित करण्यासाठी विस्तृत स्टॅटिक आणि डायनॅमिक चाचणी
ऑसिलेशन चाचण्यांची पूर्तता
प्रगत CBTC-आधारित सिग्नलिंग प्रणालीची स्थापना आणि इंटरफेस-स्तरीय चाचणी



नवीन 'मेड इन इंडिया' मोनोरेल रेक्स


नवीन २१ 'मेड इन इंडिया' मोनोरेल रेक्स हे आधुनिक सुधारणांसह आले आहेत. प्रत्येक ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, दिव्यांगांसाठी अनुकूल आसनव्यवस्था, मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंग पॉइंट्स, डायनॅमिक मार्ग नकाशे, अधिक सुरळीत प्रवासासाठी सुधारित सस्पेन्शन, अग्निसुरक्षा मानकांचे कठोर पालन करणारे डिझाइन, आधुनिक मेट्रो-शैलीतील अंतर्गत सजावट आणि रिअल-टाईम मॉनिटरिंग व सर्व्हेलन्स प्रणाली आदी सोयीसुविधा आहेत. मुंबईकरांना लवकरच अधिक सुरक्षित, अधिक स्मार्ट आणि अधिक विश्वासार्ह मोनोरेल सेवा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती एमएमआरडीएने दिली आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने